
2027 पर्यंत भारतात लाँच होणार 'या' 16 इलेक्ट्रिक कार
Mahindra and Mahindra : महिंद्रा अॅण्ड महिंद्रा वर्ष 2027 पर्यंत एसयूव्ही आणि एलसीबी श्रेणीतील 16 इलेक्ट्रिक वाहन लाँच करणार आहे.

Mahindra and Mahindra : वाहन निर्मिती कंपनी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा मंगळवारी 2027 पर्यंत एसयूव्ही आणि LCB श्रेणीतील 16 इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहेत. कंपनी याद्वारे इलेक्ट्रिक कार बाजारपेठेत आपले स्थान भक्कम करण्याच्या प्रयत्नात आहे. कंपनीने 2025 पर्यंत आपल्या एकूण महसूलात 15 ते 20 टक्के वाढीचे लक्ष्य ठेवले आहेत.
ईव्हीमध्ये 3000 कोटींची गुंतवणूक
कंपनीने आपली व्यावसायिक वाढ अधिक गतिमान करण्यासाठी खासगी इक्विटी गुंतवणूकदारांना सोबत घेण्यासाठी अथवा इलेक्ट्रिक कार व्यवसायाला एक स्वतंत्र स्वरुप देण्याचा पर्याय खुला ठेवला आहे. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा या आधीच इलेक्ट्रिक कारमध्ये 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना जाहीर केली आहे.
नवीन ब्रॅण्डची घोषणा?
कंपनी आपल्या इलेक्ट्रिक एसयूव्हीसाठी एका नवीन ब्रॅण्ड नावाबाबत विचार करत आहे. वर्ष 2027 मध्ये या नावाने कार लाँच होणार आहे. 'M&M'चे कार्यकारी संचालक राजेश जेजुरिकर यांनी म्हटले की, एसयूव्हीमध्ये आम्ही 2027 पर्यंत 13 नवीन मॉडेल लाँच करण्याचा विचार करत आहोत. यामधील आठ मॉडेल हे इलेक्ट्रिक कार असणार आहेत.
2027 मध्ये 4 नवीन एसयूव्ही
पुढे त्यांनी म्हटले की, 2027 पर्यंत एकूण युटिलिटी व्हेइकलचा (युव्ही) भाग हा किमान 20 टक्के इलेक्ट्रिक वाहनांचा असणार आहे. कंपनी 2025-2027 या दरम्यान चार नव्या इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करणार आहेत.
तिमाही निकाल जाहीर
महिंद्रा अॅण्ड महिंद्राने 30 सप्टेंबर रोजी समाप्त झालेल्या कंपनीच्या तिमाही निकालाची घोषणा केली. या तिमाहीत कंपनीचा नफा जवळपास 8 पटीने वाढला आहे. कंपनीचा नफा वाढून 1432 कोटी रुपये झाला आहे. कंपनीने याबाबत मंगळवारी माहिती दिली.
162 कोटींचा फायदा
मागील आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर या तिमाहीत 162 कोटींच्या नफ्याची नोंद केली होती. महिंद्रा अॅण्ड महिंद्राने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 15 टक्क्यांनी वाढून 13,305 कोटी झाला आहे. एक वर्षापूर्वी हा महसूल 11,590 कोटी रुपये होता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
