एक्स्प्लोर
कॅशलेस व्यवहारासाठी लिनोव्होची पेटीएमसोबत भागीदारी
मुंबई: देशात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटाबंदीनंतर सर्वच व्यवहारांवर परिणाम झाला होता. इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजारपेठेत तर एकप्रकारे मंदीच दिसून येत होती. यातून मार्ग काढण्यासाठी अनेकांनी पेटीएमचा मार्ग वापरला. यात लिनोव्होने बाजी मारली असून पेटीएमसोबत भागीदारी करार करुन ग्राहकांना खरेदीचा नवा मार्ग उपलब्ध करुन दिला आहे.
नोटाबंदीच्या निर्णयामुळे लॅपटॉप तसेच इतर इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू खरेदीवर मोठा परिणाम झाला होता. पण लिनोव्हो कंपनीने पेटीएमसोबत भागीदारी करार करुन ग्राहकांना दिलासा दिला आहे. या उपक्रमातंर्गत लिनोव्होच्या 40 शहरांतील 350 टॉप रिटेल स्टोअर्सवरच लिनोव्होची ही सेवा उपलब्ध आहे.
विशेष म्हणजे, लिनोव्होने झिरो इंटरेस्ट ईएमआयचाही पर्याय ग्राहकांना उपलब्ध करुन दिला आहे. यामुळे ग्राहकांना कोणतेही लॅपटॉप खरेदी करताना झिरो डाऊन पेमेंटसह खरेदी करता येणार आहेत.
या उपक्रमाबद्दल माहिती देताना लिनोव्हो इंडियाचे कन्झ्युमर, ऑनलाईन आणि ई-कॉमर्स विभागाचे प्रमुख आणि कार्यकारी संचालक राजेश थडानी म्हणाले की, ''आम्ही ही ऑफर आमच्या ग्राहक व चॅनेल भागिदारांसाठी डिझाईन केली असून, जेणेकरुन त्यांना खरेदीचा उत्तम अनुभव ग्राहकांना मिळू शकेल.''
लिनोव्होचे सर्व नोटबुक पोर्टफोलिओ हे वरील उपक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आले असून, झिरो डाऊनपेमेंटची स्कीम 30 नोव्हेंबर 2010 पर्यंत ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement