एक्स्प्लोर
‘लॅम्बोर्गिनी’चा नवा फोन लॉन्च
सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे, तर रिअर म्हणजे मागचा कॅमेरा तब्बल 20 मेगापिक्सलचा आहे.
मुंबई : हेडिंग काहीतरी चुकलंय असं वाटतं ना? महागड्या आणि अतिच पॉश गाड्या बनवणारी लॅम्बोर्गिनी कंपनी मोबाईलच्या क्षेत्रात कशाला पडेल? पण खरंय मित्रांनो, लॅम्बोर्गिनी कंपनीनं नवा एन्ड्रॉईडबेस मोबाईल सादर केलाय. आता इकॉनॉमी रेंज मधला फोन असल्यानं त्याची किंमतही कमीच असायला हवी ना... हो, तशी कमीच आहे या मॉडेलची किंमत... पण थांबा, किंमतीकडे वळण्याआधी या फोनमध्ये नेमके फिचर तरी कोणते आहेत ते पाहू या...
टिटॅनियमपेक्षाशी जास्त मजबूत असलेल्या धातूनं हा मोबाईल तयार करण्यात आला असून कोणत्याही परिस्थितीत तो तुटणार फुटणार नाही, याची हमी ग्राहकांना देण्यात आलीय. याशिवाय उत्कृष्ट कलाकुसर असलेल्या इटालियन चामड्याचं या मोबाईल बॅक कव्हर आहे. डेन्टप्रुफ लिक्विड अलॉयचाही यात वापर करण्यात आल्यानं ड्युरॅबीलीचा प्रश्न नाही.
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 800 एवढ्या उच्च क्षमतेचा प्रोसेसर त्यात वापरला असून 4 GB रॅम देण्यात आलीय. त्यामुळे मल्टीटास्कींग आणि मल्टीविंडोमध्ये काम करणं सोपं पडणार आहे. साडेपाच इंचाचा डिस्प्ले तुम्हाला सुखद पिक्चरची अनुभूती देतो. कारण आहे ते 1560*1440 पिक्सलचं रिझॉल्युशन. या व्यतिरीक्त फिंगर सेंसर असला तरी खास आकर्षण म्हणजे डॉल्बी एटमॉस ड्युएल स्पीकर्स वीथ 3-D एकॉस्टीक सिस्टीम. यामुळे संगीताचा परमोच्च अस्वाद घेणं शक्य होणार आहे. अगदी टाचणी पडल्याचा आवाजही यात थेट ऐकता येईल असं सांगितलं जातं. त्यामुळे संगीताची आवड असलणाऱ्यांसाठी हा फोन निश्चितच फायदेशीर ठरू शकतो.
सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे, तर रिअर म्हणजे मागचा कॅमेरा तब्बल 20 मेगापिक्सलचा आहे. त्यामुळे अचूक आणि उत्कृष्ट फोटो काढता येतील असं सांगितलं जातंय. यासाठी दोन स्वतंत्र एलईडी लाईट्सही देण्यात आलेत. त्यामुळे रात्र वा अंधारी जागा असेल तरी सुस्पष्ट फोटो काढणं शक्य होणार असल्याचं सांगितलं जातंय.
सुपरलक्झरी कॅटेगिरीमधल्या इकॉनॉमी श्रेणीतल्या या फोनची किंमत किती असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या फोनची किंमत जेमतेम अडीच हजार डॉलर्स ठेवण्यात आलीय. भारतीय रूपयांत याची किंमत आहे फक्त 1 लाख 57 हजार रूपये. या किंमतीत VAT आणि डिलीव्हरी चार्जेसचा समावेश नाही.
सध्या लंडन आणि दुबईतल्या मॉल्समधल्या निवडक बुटीक्समध्ये हा फोन उपलब्ध आहे. लवकरच एखाद दुसऱ्या ऑनलाईन शॉपिंग साईटवरही तो उपलब्ध होउ शकेल, पण त्यासाठी कस्टम ड्युटी तुम्हाला भरावी लागणार आहे, हे लक्षात ठेवा. या फोनच्या ग्राहकांचा वर्ग लक्षात घेउन इटालियन ग्रँड लेदरची एक केसही भेट म्हणून देण्यात येणार आहे.
लॅम्बोर्गिनीने आपल्या ग्राहकांसाठी सादर केलेला इकॉनॉमी क्लासमधला हा पहिलाच फोन आहे. यापूर्वी टोनिने लॅम्बोर्गिनी 88 हे मॉडेल सुपरलक्झरी श्रेणीत सादर केले आहे. या फोनची किंमत साधारणतः साडेचार लाख रूपयांचा आसपास आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement