एक्स्प्लोर
आता व्होडाफोनचीही अनलिमिटेड कॉलिंग आणि 4G डेटा ऑफर
मुंबई : दूरसंचार क्षेत्रातील वाढती स्पर्धा पाहत व्होडाफोनने प्रीपेड ग्राहकांसाठी खास अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 4G डेटा प्लॅनची घोषणा केली आहे. व्होडाफोनने दोन प्रकारांमध्ये तीन प्लॅन लाँच केले आहेत. ज्याची सुरुवात 19 रुपयांपासून आहे.
पहिला प्लॅन : 19 रुपयांमध्ये असलेल्या प्लॅनमध्ये एका दिवसासाठी अनलिमिटेड व्होडाफोन टू व्होडाफोन लोकल-एसटीडी व्हॉईस कॉलिंग आणि 100 MB 4G डेटा देण्यात येईल.
दुसरा प्लॅन : व्होडाफोनचा दुसरा प्लॅन 49 रुपयांचा आहे. यामध्ये सात दिवसांसाठी व्होडाफोन टू व्होडाफोन अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 250MB 4G डेटा मिळेल.
तिसरा प्लॅन : व्होडाफोनने तिसरा प्लॅन 89 रुपयांचा दिला आहे. याची व्हॅलिडीटीही सात दिवसांचीच आहे. मात्र यामध्ये डेटा प्लॅनचा समावेश नाही. या प्लॅनमध्ये ग्राहकांना व्होडाफोन टू व्होडाफोन अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि इतर नेटवर्कवर बोलण्यासाठी 100 मिनिट मिळतील.
व्होडाफोनचे हे सुपर डे आणि सुपरवीक प्लॅन रिटेल स्टोअर्स, व्होडाफोन वेबसाईट किंवा व्होडाफोन अॅपवर मिळतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement