एक्स्प्लोर

भारतात बनलेली दमदार एसयूव्ही Jeep Compass लॉन्च, किंमत...

विशेष म्हणजे ही एसयूव्ही भारतातच बनवली आहे. Jeep Compass पाच रंगांमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये मिनिमल ग्रे, एग्झॉटिक रेड, व्होकल व्हाईट, हायड्रो ब्लू आणि ब्रिलियंट ब्लॅकचा समावेश आहे.

मुंबई : अमेरिकन ऑटोमोबाईल कंपनी जीपने भारतात आपली एसयूव्ही Jeep Compass लॉन्च केली आहे. खरंतर तर Jeep Compass अधिकृतरित्या आधीच लॉन्च केली होती, परंतु आज याच्या किंमतीची घोषणा झाली आहे. या कारची सुरुवातीची किंमत 14.95 लाख रुपये आहे, तर टॉप मॉडेल 20.65 लाख रुपयांची आहे. विशेष म्हणजे ही एसयूव्ही भारतातच बनवली आहे. Jeep Compass पाच रंगांमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये मिनिमल ग्रे, एग्झॉटिक रेड, व्होकल व्हाईट, हायड्रो ब्लू आणि ब्रिलियंट ब्लॅकचा समावेश आहे. Jeep Compass मल्टीएअर पेट्रोलच्या तीन व्हेरियंट आणि 7 मल्टीएअर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये स्पोर्ट, लॉन्गिट्यूड, लॉन्गिट्यूड ऑप्शन, लिमिटेड, लिमिटेड ऑप्शन, लिमिटेड 4X4 आणि लिमिटेड ऑप्शन 4X4 ऑप्शनचा समावेश आहे. Jeep Compass च्या एक व्हेरियंटमध्ये 1.4 लीटर पेट्रोलचे 4 इंजिन लावण्यातं आलं आहे, जे 160 हॉर्स पॉवर देतं. दुसरं इंजिन 2.0 लीटर डीझेलचं आहे, जे 173 हॉर्स पॉवर देतो. यात 6 स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन आहे. पेट्रोल व्हेरियंटसाठी 7 स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा ऑप्शनही आहे. बाजारात ही एसयूव्ही आल्यानंतर सध्या उपलब्ध असलेल्या दुसऱ्या एसयूव्हीला कडवी टक्कर मिळू शकते. Jeep_Compass सेफ्टी फीचर्सबाबत कंपनीचा दावा आहे, यामध्ये 50 पेक्षा जास्त सेफ्टी आणि सिक्युरिटी फीचर्स देण्यात आले आहेत. या फीचर्समध्ये एबीएस, हिल स्टार्ट अॅसिस्ट, अॅडेप्टिव्ह ब्रेक लाईट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि पॅनिक ब्रेक असिस्ट यांसारखे अत्याधुनिक सिस्टमचा समावेश आहे. खास गोष्ट म्हणजे यामध्ये सहा एअरबॅग देण्यात आले आहेत. Jeep Compass मध्ये 16 इंचाची स्टील अॅलॉय व्हील्स आहे, तर याच्या टॉप मॉडेलमध्ये 17 इंचाची अॅलॉय व्हील्स आहेत. याचा ग्राऊंड क्लिअरन्स 178mm आहे. म्हणजेच ही कार ऑफ रोड सहजरित्या चालवता येऊ शकते. जीप इंडियाच्या माहितीनुसार, वर्ष अखेरीस देशात 50 आऊटलेट्स उघडण्यात येतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Embed widget