इन्स्टाग्रामचं नवीन फीचर, अल्पवयीन मुलांसाठी फायदेशीर
अल्पवयीन मुलांसाठी असा मजकूर धोकादायक असतो. त्यामुळे अशा अल्पवयीन मुलांना यापासून दूर ठेवण्यासाठी हे फीचर फायदेशीर ठरणार आहे.
मुंबई : वादग्रस्त आणि अश्लील मजकूरावर आळा घालण्यासाठी इन्स्टाग्रामनं नवं फीचर आणलं आहे. सेन्सिटिव्ह स्क्रीन असं या फीचरचं नाव आहे. या फीचरमुळे अश्लील फोटो, व्हिडिओ, थंबनेल्सवर युजर जोपर्यंत क्लिक करत नाह तोपर्यंत ते ब्लर दिसतील.
वोग को यूकेच्या रिपोर्टनुसार, भारतात इन्स्टाग्राम वापरणाऱ्या युजर्ससाठी हे आणण्यात आलं आहे. इन्स्टाग्रामवर अश्लील फोटो, सर्च, रिकमेंड किंवा सर्च केल्यानंतर अचानक अश्लील फोटो किंवा व्हिडिओ नजरेसमोर येतो. अल्पवयीन मुलांसाठी असा मजकूर धोकादायक असतो. त्यामुळे अशा अल्पवयीन मुलांना यापासून दूर ठेवण्यासाठी हे फीचर फायदेशीर ठरणार आहे.
इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मुसेरी यांनी 'द टेलिग्राफ'ला लिहिलेल्या पत्रात सेन्सिटिव्ह स्क्रीन फीचर सुरु केल्याची घोषणा केली. ब्रिटनमध्ये एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली होती. आत्महत्येला प्रवृत्त करणारा मजकूर वाचल्याने आपल्या मुलीने आत्महत्या केली होती, असा आरोप आत्महत्या केलेल्या मुलीच्या पालकांनी केला होता.