Instagramचं नवं फिचर; डिलीट झालेले फोटो अन् व्हिडीओ रिस्टोअर करणं शक्य
इन्स्टाग्रामने एक नवं फिचर लॉन्च केलं आहे. इन्स्टाग्रामच्या नव्या फिचरमुळे आता युजर्सना त्यांचे डिलीट झालेले फोटो आणि व्हिडीओ पुन्हा रिस्टोअर करणं शक्य होणार आहे.
![Instagramचं नवं फिचर; डिलीट झालेले फोटो अन् व्हिडीओ रिस्टोअर करणं शक्य Instagram rolls out recently deleted folder feature users will be able to restore photos and videos Instagramचं नवं फिचर; डिलीट झालेले फोटो अन् व्हिडीओ रिस्टोअर करणं शक्य](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/05002050/Instagram.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram आपल्या युजर्ससाठी एक खास फिचर घेऊन आलं आहे. या फिचरच्या मदतीने युजर्स आपले काही दिवसांपूर्वी डिलीट केलेले फोटो, व्हिडीओ आणि पोस्ट्स रिस्टोअर करु शकणार आहेत. याची माहिती कंपनीने एका ब्लॉगमार्फत दिली आहे. जाणून घेऊया हे नवं फिचर्स नेमकं वापरायचं कसं?
30 दिवसांच्या आत रिस्टोअर करता येणार डेटा
इंस्टाग्रामचं नवं फिचर Recently Deleted Folder मध्ये काही दिवसांपूर्वीची डिलीट करण्यात आलेले व्हिडीओ-फोटो दिसतील. या फोल्डरमध्ये इन्स्टाग्राम स्टोरी मात्र केवळ 24 तासांसाठीच दिसेल. परंतु, इतर मीडिया फाईल्स 30 दिवसांपर्यंत याच फोल्डरमध्ये राहतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, युजर्सला आपली स्टोरी केवळ 24 तासांच्या आत रिस्टोअर करु शकतात. त्यानंतर या फोल्डरमधून ही स्टोरी आपोआप डिलीट होईल. एवढंच नाहीतर, या फिचरच्या मदतीने Reels आणि IGTV देखील रिस्टोअर करता येतील.
असं वापरा Recently Deleted फिचर
- इन्स्टाग्रामच्या Recently Deleted Folder फिचर यूज करण्यासाठी तुम्हाला अॅप अपडेट करावं लागेल.
- आता अॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन अकाउंटमध्ये जा.
- त्यानतंर रिसेंटली डिलीटेडचा ऑप्शन सिलेक्ट करा.
हॅकर्सपासून बचावासाठी मदत
जर तुमचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅकर्सनी हॅक केलं, तर हे फिचर फायदेशीर ठरतं. हॅकर्सनी तुमचे फोटो-व्हिडीओ इत्यादी डिलीट केले असतील, तर या फिचरमार्फत तुम्हाला रिसेंटली डिलीडेट फिचरमध्ये जाऊन तुम्ही तुमचे फोटो आणि व्हिडीओ रिस्टोअर करु शकता.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)