(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PUBG गेम भारतात पुन्हा सुरु होणार? कंपनीच्या तयारीमुळे गेम लव्हर्सच्या आशा कायम
PUBG कॉर्पोरेशनने देखील भारतात कर्मचारी भरती सुरू केली. इतकेच नाही तर मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये गेम्सचे टीझरही लाँच केले गेले. त्यानंतर असा विचार केला जात होता की हा गेम लवकरच पुन्हा भारतात प्रवेश करेल.
मुंबई : यावर्षी 26 जानेवारीला FAUG गेम लॉन्च करण्यात आला आहे. परंतु गेम प्रेमी अद्याप PUBG Mobile India ची प्रतीक्षा करत आहेत. PUBG गेमची आवड असणाऱ्या लोकांना आशा आहे की PUBG नक्कीच भारतात पुन्हा सुरु होईल. केंद्र सरकारने टिक टॉकसह अनेक चीनी अॅप्सवर कायमची बंदी घातली आहे. यात बर्याच गेम अॅपचाही समावेश आहे. परंतु PUBG वेडे आहेत त्यांच्यासाठी चांगली बातमी अशी आहे की सरकारने PUBG ला या यादीतून वगळले आहे. म्हणजेच PUBG पुन्हा सुरु होईल अशी अपेक्षा आहे.
PUBG भारतात परत येण्याची शक्यता
एका आरटीआयला उत्तर देताना मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशनने म्हटलं होतं की सरकारने PUBG वर बंदी घातलेली नाही. त्यामुळे असे मानले जात आहे की मंत्रालयाने आयटी कायदा 2000 च्या कलम 69 ए अंतर्गत या गेमपर्यंत सार्वजनिक प्रवेश अवरोधित केला आहे. माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्रालयाने असंही म्हटले आहे की, त्या काळात PUBG/Krfton आणि सरकार यांच्यात अधिकृत चर्चा झालेली नाही. या सर्व प्रकारानंतर हा गेम भारतात परत येऊ शकेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
PUBG ची तयारी पूर्ण
भारतात PUBG बंदीनंतर Tencent Games कंपनीकडून PUBG मोबाइलचे हक्क मागे घेण्यात आले होते. या व्यतिरिक्त, PUBG कॉर्पोरेशनने देखील भारतात कर्मचारी भरती सुरू केली. इतकेच नाही तर मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये गेम्सचे टीझरही लाँच केले गेले. त्यानंतर असा विचार केला जात होता की हा गेम लवकरच पुन्हा भारतात प्रवेश करेल. अलीकडेच कंपनीने अनीश अरविंद यांना PUBG मोबाइल इंडियाचे कंट्री मॅनेजर म्हणूनही नियुक्त केले आहे. हे सर्व पाहता असे दिसते की कंपनीला कोणत्याही परिस्थितीत PUBG भारतात परत आणायचे आहे. यासाठी सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळण्याची वाट पाहिली जात आहे.