Instagram : फेसबुक, ट्विटरनंतर आणि इन्स्टाग्रामवरही रशियाने घातली बंदी, 'हे' आहे कारण
Instagram : यापूर्वी मार्चमध्ये रशियाने फेसबुक आणि ट्विटरवर बंदी घातली होती. युक्रेनमधील लष्करी कारवाईबाबत उपलब्ध माहितीवर नियंत्रण ठेवण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग म्हणून रशियाने हे पाऊल उचलले.
Instagram : युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशिया सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सतत बंदी घालत आहे. आज रशियाने इन्स्टाग्रामवर बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत, तेथील यूजर्स यापुढे इन्स्टाग्राम वापरू शकणार नाहीत. रशियन सैनिकांविरुद्ध हिंसाचार वाढवण्यासाठी त्याचा वापर केला जात असल्याचा आरोप करत रशियाने इन्स्टाग्राम ब्लॉक केले आहे.
मार्चच्या सुरुवातीला रशियाने फेसबुक आणि ट्विटरवर बंदी घातली होती. युक्रेनमधील लष्करी कारवाईबाबत उपलब्ध माहितीवर नियंत्रण ठेवण्याच्या व्यापक प्रयत्नांचा भाग म्हणून रशियाने हे पाऊल उचलले. मीडिया नियामक Roskomnadzor यांनी एका निवेदनात म्हटले आहे की ते Instagram बंद करत आहेत. कारण या प्लॅटफॉर्मवरून रशियन नागरिक आणि सैनिकांविरुद्ध हिंसाचाराला प्रोत्साहन देत आहे.
इन्स्टाग्राम बंदीचा निर्णय :
आता मेटा असलेल्या फेसबुकने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबाबतचे नियम बदलल्यानंतर रशियाने इन्स्टाग्रामवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. युक्रेनवरील रशियन हल्ल्याच्या निषेधार्थ द्वेषयुक्त भाषण धोरण बदलत असल्याचे मेटाने आपल्या निवेदनात म्हटले होते. या अंतर्गत रशियाने आपल्या यूजर्सना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या विरोधात उघडपणे बोलण्याची परवानगी दिली.
रशियन तरुणांमध्ये इन्स्टाग्राम लोकप्रिय :
रशियामध्ये फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. हे रशियन तरुणांमध्ये सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. इन्स्टाग्राम बंदीबाबत इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी यांनी ट्विट केले की, "सोमवारपासून रशियामध्ये इन्स्टाग्राम ब्लॉक केले जाईल. या निर्णयामुळे रशियातील 80 दशलक्ष लोक एकमेकांपासून आणि उर्वरित जगापासून दूर होतील. कारण रशियातील 80 टक्के लोक इन्स्टाग्रामला फॉलो करतात."
महत्वाच्या बातम्या :
- Russia Ukraine War : रशियाला YouTube चा आणखी एक झटका, रशियामधून निधी मिळालेल्या जगभरातील सर्व चॅनेलवर बंदी
- तुम्हाला Truecaller वरून तुमचे नाव नंबर काढायचे आहे का? मग फॉलो करा 'या' स्टेप्स
- Clop Ransomware : ऑपरेटिंग सिस्टम हॅंग करणारा 'क्लॉप रॅन्समवेअर' मालवेअर, 'अशी' घ्या काळजी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha