एक्स्प्लोर

देशासोबत विश्वासघात, ATS ने ठाण्यातून आरोपीला उचललं, पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याचा आरोप

पहगलाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट उसळली होती. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पाकिस्तानला व दहशतवाद्यांना थेट इशारा दिला होता

मुंबई : राज्यातील एटीएस म्हणजेच दहशतवाद (ATS) विरोधी पथकांने मोठी कारवाई केली असून पाकिस्तानी तपास यंत्रणांना भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्राची गोपनीय माहिती दिल्याप्रकरणी एका व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने संबंधित व्यक्तीला अटक केली असून या व्यक्तीच्या चौकशीतून आरोपी हा पाकिस्तानच्या (Pakistan) इंटेलिजन ऑपरेटिव्ह POI च्या नोव्हेबर 2024 पासून संपर्कात होता, अशी माहिती समोर आली आहे. फेसबुकद्वारे आरोपीची ओळख  POI शी संबधित व्यक्तीसोबत झाली होती. त्यानंतर, 2024 ते 2025 पर्यंत या आरोपीने भारताने प्रतिबंधक केलेल्या क्षेत्राची गोपनीय माहिती सोशल मिडियाच्या माध्यमातून पाकिस्तानला पुरवल्याची माहिती तपासात समोर आली आहे. देशाविरुद्ध गद्दारी करणारा हा आरोपी ठाण्याचा असून एटीएसकडून अधिक तपास  करण्यात येत आहे. 

पहगलाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट उसळली होती. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पाकिस्तानला व दहशतवाद्यांना थेट इशारा दिला होता. त्यानुसार, भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. या घटनेनंतर देशभरातून भारतीय सैन्य दलाच्या कामगिरीचा अभिमान बाळगला जात आहे. मात्र, दुसरीकडे हेरगिरी प्रकरणात हरयाणातील ज्योती मल्होत्रा या सोशल मीडिया एन्फ्लुअर्सलाही अटक करण्यात आली आहे. होय, आम्ही पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याची कबुली ज्योतीने तपासादरम्यान दिली. त्यामुळे आता ज्योती मल्होत्राच्या अडचणीत वाढ होणार आहे. याबाबत अद्याप पोलिसांकडून अधिकृत सांगण्यात आलं नसून वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तावरुन ही माहिती समोर आली आहे. त्यातच, आता ठाण्यातून आणखी एका देशाच्या गद्दाराला अटक करण्यात आली आहे. 

देशहिताची गोपनीय माहिती POI ला पुरवल्या प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाकडून या प्रकरणी संबंधित व्यक्तीयासह तो संपर्कात असलेल्या POI च्या 2 व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, दहशतवाद विरोधी पथकाने कलम 3 (1), ब, 5 (अ), भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 61 (2) अन्वेय गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी, अधिक तपास दहशतवाद विरोधी पथक करत आहेत. दरम्यान, संबंधित आरोपी हा मूळचा ठाण्याचा राहणारा आहे. 

रविंद वर्मा ठाण्यातला रहिवाशी

रविंद्र मुरलीधर वर्मा असं आरोपीचं आरोपीचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. 25 वर्षीय रविंद्र वर्मा हा संरक्षण दलात छोट्या पदावर कार्यरत असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र, वर्माने देशासोबत गद्दारी का केली, पैशासाठी की त्यालाही हनीट्रॅपच्या माध्यमातून अमिष दाखवण्यात आलं, याचा तपास एटीएस अधिकारी आहेत. मात्र, या घटनेनं पुन्हा एकदा देशाच्या सुरक्षेसंदर्भात गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

हेही वाचा

थेट सीबीआय... पासपोर्ट कार्यालयात धाड; लाच घेताना अधिकाऱ्यासह दलालास अटक, 5 दिवसांची पीसी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पायी परिक्रमा करत असलेल्या जैन मुनींचा अपघातात मृत्यू, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घडली घटना
पायी परिक्रमा करत असलेल्या जैन मुनींचा अपघातात मृत्यू, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घडली घटना
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
धक्कादायक! दहीसरमध्ये बाईक पार्क करण्याच्या वादातून युवकाची हत्या, तासाभरातच आरोपीला अटक 
धक्कादायक! दहीसरमध्ये बाईक पार्क करण्याच्या वादातून युवकाची हत्या, तासाभरातच आरोपीला अटक 
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget