IPL 2025, PBKS vs RCB Qualifier 1: उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे

IPL 2025, PBKS vs RCB Qualifier 1: आज आपीएल 25 मधील पहिल्या क्वालिफायर सामना खेळविण्यात येईल... हा सामना कधी ही स्पर्धा जिंकू न शकलेल्या दोन संघांमध्ये खेळविला जाईल... विजेता संघ थेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठेल... जर पंजाब संघ विजेता ठरला तर तो एक इतिहास घडेल.. गेली 18 वर्ष या स्पर्धेत एक संघ सतत पराभूत होत आहे... त्यांची फ्रॅंचाईजी ओनर आपल्या गालावरच्या खळी सोबत कायम संघासोबत आहे... एक दिवस माझा संघ जिंकेल या आशावादावर हा सोज्वळ चेहरा मैदानावर आपल्या संघाला आत्मविश्वास देत आला आहे... आता केवळ दोन विजय, विजेतपद आणि तिच्यामध्ये प्रीतिसंगम घडवू शकतील... येत्या 3 जून रोजी जर हे प्रत्यक्षात घडले तर या मालकीण बाईंच्या चेहऱ्यावरील हसू, आनंदाश्रू मुळे अधिक खुलेल हे नक्की...
दुसऱ्या बाजूला पंजाब आणि बंगळूर संघाच्या या सामन्याला भाव भावनांचे पदर आहेत... क्रिकेट विश्वातील एक महानायक.... ज्याने आपल्या पराक्रमाच्या भरपूर गाथा लिहिल्या... त्याला आणखीन एका विजेतपदाची गाथा लिहायची आहे.... जे त्याला आजवर शक्य झाले नाही ते शक्य करण्यासाठी हा खेळाडू मैदानात उतरेल...आतापर्यंत या स्पर्धेत तो एखाद्या योद्धा सारखा खेळत आला आहे... काल देखील त्याने अप्रतिम खेळ करून विजयाचा पाया रचला होता....अर्धशतक करताना त्यांना आकाश याला मारलेला एक कव्हर ड्राईव्ह ,त्याच्या दर्जाची साक्ष देत गवत कापीत सीमापार होत गेला...स्पर्धेत 600 हून अधिक धावा करून "एज इज जस्ट नंबर"...हे त्याने सिद्ध केले आहे.. .त्याचा मैदानातील वावर सपूर्ण संघाची देहबोली बदलवून टाकतो...उद्या जेव्हा तो मैदानात उतरेल तेव्हा मोठ्या स्टेज वर तो आपल्या मनातील एक शल्य दूर करण्याचा प्रयत्न करेल...त्याची महानता सिद्ध करण्यासाठी हा काही मापदंड नाही....पण विराट खेळाडू स्वतःचे मापदंड उंचीवर नेऊन ठेवतात... एक विजेतेपद या विराट खेळाडूचा आनंद आणखीन वाढवेल... आणि त्याचप्रमाणे त्याच्या चहात्यांच्या आनंदाला पारावर उरणार नाही...बंगळूर संघाच्या गोलंदाजीला नेहमी नावे ठेवली जायची पण आज त्यांच्याकडे उंच हे जलवूड आहे...यश दयाळ आहे...भुवि आहे...चलाख कुणाल आणि सुंदर ऍक्शन असलेला सुयश आहे....
बंगळूर संघाची मधली फळी रजत आणि जितेश यांच्यामुळे मजबूत आहेच पण शेफर्ड मुळे ती अधिक धोकादायक आहे....काल जितेश याने त्याच्या जीवनातील एक सुंदर खेळी केली...काल त्याच्यामध्ये दिनेश कार्तिक दिसला.. तोच आत्मविश्वास तीस देहबोली.... तीच फटक्यांची रेंज... काल जितेश याला पाहून, सेहवाग त्याला इतका का हाय रेट करतो हे समजून आले....काल बंगळूर संघाच्या विजयात नांगर टाकणारा मयंक देखील महत्त्वाचा होता...त्याचा नांगर आणि जितेश याचा जागर संघाला क्वालिफायर मध्ये घेऊन आले....
दुसऱ्या बाजूला विराट कोहली याचीच देहबोली बोलणारा श्रेयस आहे...त्याच्या मनात देखील भावभावनांचे खेळ चालू असतील....गेल्या विजेते पद मिळालेल्या संघाचा कर्णधार आज दुसऱ्या एका संघाचे कर्णधार पद सांभाळत आहे, ही घटना तशी क्वचितच पाहायला मिळते....पण "ठुकरा के मेरा प्यार" हे गाणे त्याला चांगले माहित आहे...हे गाणे गातच तो मैदानात उतरेल...त्याला त्याच्या यशाचे श्रेय मिळाले नाही ही भावना त्याच्या मनात असेलच... आपण किती देखील म्हणालो की ते पक्के व्यावसायिक खेळाडू आहेत, पण लक्षात घ्या ती देखील माणस आहेत ,आणि त्यांच्या देखील एक हृदय आहे, ज्याच्यामध्ये भावभावनांचा एक कप्पा कायम असतो...श्रेयस जेव्हा मैदानात वावरत असतो तेव्हा त्याची देहबोली त्याच्यामध्ये असलेला प्रचंड आत्मविश्वास दाखवीत असते.... लीड फ्रॉम द फ्रंट हे तो ज्याला आदर्श मानतो त्या रोहित शर्मा च्या पावलावर पाऊल ठेवून करतो. ..या स्पर्धेत कित्येक सामन्यात त्याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला... संघाला कायम प्रेरणा देण्यात तो पुढे राहिला... मुंबई विरुद्ध च्या सामन्यात गोलंदाजीचा चलाखपणे वापर करून आपण एक बुद्धिमान कर्णधार आहोत हे सिद्ध केले.... या स्पर्धेत जर तो विजेतेपदाला गवसणी घालू शकला तर रोहित शर्मा नंतर तो दुसरा कर्णधार होऊ शकेल..
पंजाब संघाची ताकद सुद्धा मोठी आहे..... प्रभ सिमरन आणि प्रियांश आर्या... कुठल्याही खेळपट्टीवर कुठल्याही गोलंदाजी समोर आव्हान उभे करू शकतात.... मिडविकेट पट्ट्यातील धावा वसूल करण्यात प्रभ सिमरन पटाईत आहे... तर कव्हर मध्ये सध्या प्रियांश उत्तम खेळत आहे.... त्यांच्या जोडीला जोश इंग्लिश आक्रमकतेचा वसा घेऊन आलेला आहे... मधल्या फळीत शशांक सिंग नावाचा फलंदाज आणि स्टायनीस त्यांच्या फळीला एक्स फॅक्टर देऊन जातात.... गोलंदाजी त्यांच्याकडे आर्षदीपसारखा हुशार गोलंदाज आहे.... जॉन्सन आहे..युजवेंद्र चेहेल आहे हरप्रीत बार सारखा गोलंदाज फिरकी गोलंदाजी ताकद वाढवतो...
दोन्ही संघ विजेतेपदासाठी उत्सुक आहेत... त्यांना एक पाऊल पुढे टाकत जाणे आहे...
म्हणून गझलकर अबिद शेख यांच्या ओळी आज म्हणाव्याशा वाटतात "उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे"

























