तुम्हाला Truecaller वरून तुमचे नाव नंबर काढायचे आहे का? मग फॉलो करा 'या' स्टेप्स
Truecaller हे सर्वात लोकप्रिय अॅप आहे, जे आजकाल लाखो लोक वापरत आहेत. याचे अनेक फायदे आहेत. ट्रू कॉलर तुम्हाला फोन करणार्या व्यक्तीचा कॉलर आयडी पाहण्यास मदत करतो.
Truecaller हे सर्वात लोकप्रिय अॅप आहे, जे आजकाल लाखो लोक वापरत आहेत. याचे अनेक फायदे आहेत. ट्रू कॉलर तुम्हाला फोन करणार्या व्यक्तीचा कॉलर आयडी पाहण्यास मदत करतो. जरी तुमच्या फोन बुकमध्ये त्या युक्तीचा नंबर सेव्ह नसला तरी, तुम्हाला त्या व्यक्तीच नाव ट्रू कॉलरद्वारे कळू शकते. याशिवाय Truecaller तुम्हाला अनोळखी नंबरचे तपशील मिळवण्यात मदत करतो. याच्या मदतीने तुम्ही स्कॅम कॉल देखील ट्रॅक करू शकता.
डिजिटल मीडियामुळे आपले जीवन सोपे झाले आहे. परंतु त्याच वेळी यामुळे आपलं खासगी आयुष्य देखील नष्ट होत आहे. तुम्ही याची सेवा कधीही वापरली नसली तरीही, तुमचे नाव आणि नंबर Truecaller च्या डेटाबेसमध्ये असू शकतो. कारण इतर कोणीतरी तुमचे संपर्क तपशील सेव्ह केले असतील आणि अॅपला ते अॅक्सेस करण्याची परवानगी दिली असेल. तर त्याद्वारे तुमचं नाव यामध्ये सर्च केले जाऊ शकते. अशातच तुम्हाला तुम्हाला Truecaller वरून तुमचे नाव नंबर काढायचे असल्यास सर्वात आधी तुम्ही तुमचे TrueCaller अकाउंट डिलीट करा. मात्र हे अकाउंट कसे डिलीट करायचे, हे जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
Truecaller वरून तुमचे नाव कसे काढाल?
- सर्वात आधी Truecaller अॅप ओपन करा.
- आता वरच्या उजव्या कोपर्यात असलेल्या चिन्हावर टॅप करा.
- आता Settings वर जा.
- आता About वर जा.
- आता Deactivation Account पर्याय निवडा.
- एक पॉप अप दिसेल की 'खाते निष्क्रिय करून तुम्ही तुमचा प्रोफाइल डेटा हटवाल. तुम्हाला पुढे जायचे आहे का?'
- Yes असे निवडा.
- यानंतर तुम्ही Truecaller मधून लॉग आउट व्हाल. आता तुम्ही तुमचे Truecaller अकाउंट निष्क्रिय केले आहे. यानंतर तुम्ही तुमचा नंबर या सेवेमधून काढून टाकण्यासाठी पुढे जाऊ शकता..
Truecaller वरून तुमचा फोन नंबर कसा डिलीट कराल?
- सर्वात आधी truecaller.com च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- यानंतर Truecaller च्या 'Unlit phone number' पेजवर जा.
- आता Country Code सह तुमचा फोन नंबर प्रविष्ट करा. उदा (+910000000000000)
- आता 'I'm not a robot' व्हेरिफाय करा.
- त्यानंतर व्हेरिफिकेशन कॅप्चा टाका आणि 'अनलिस्ट' पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर तुमचा नंबर Unlisted होण्यासाठी 24 तास लागू शकतात.