Supriya Sule On Sanjay Raut : तहान लागल्यावर गटारातलं पाणी पितं नाही? संजय राऊतांचा टोला
Sanjay Raut on Supriya Sule : सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे नाव तुम्ही वारंवार घेत आहात. काही नेत्यांना सत्तेची तहान नक्कीच लागली असेल. मात्र, तहान लागली म्हणून गटारातला गढूळ पाणी पीत नाही, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला आहे. शरद पवारांच्या पक्षातील काही नेते भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. यावर संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केल्याबाबत देखील संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, माननीय मुख्यमंत्र्यांनी या राज्याचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय शरद पवार यांच्यातल्या अथक परिश्रम आणि सातत्याचं कौतुक केलं आणि त्याच्याबद्दल कोणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. तुम्ही राजकीय टीका कितीही केली तरी हे जे एका नेत्यामध्ये गुण आहेत ते महाराष्ट्राला आणि देशाला मान्य करावे लागतील. नुसतं कौतुक करून चालणार नाही, परिश्रम, सातत्य, संयम या गुणांची कास देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील घेतली पाहिजे, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
.





















