(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Infinix 5G Phone : इन्फिनिक्स कंपनीचा पहिला 5जी स्मार्टफोन सादर, पाहा कसा आहे 'झीरो 5जी'
5G Phone : भारतात लवकरच 5जी तंत्रज्ञान सर्वत्र पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वच कंपन्या 5जी फोन लॉन्च करत आहेत.
Infinix 5G Phone : भारतात लवकरच सर्वत्र 5G नेटवर्क काही दिवसांतच पाहायला मिळणार आहे. दमदार अशा या नेटवर्कमुळे तांत्रिक विश्वात मोठी प्रगती होणार असून विविध क्षेत्रांना याचा फायदा होईल. ऑफिस, शाळा अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी मागील काही काळात केवळ ऑनलाईन पद्धतीने सुरु होत्या. त्यामुळे स्मार्टफोन आणि दमदार नेटवर्क याची मोठी गरज सर्वत्र निर्माण झाली आहे. त्यामुळे विविध स्मार्टफोन कंपन्या आपले आधुनिक फोन लॉन्च करत असून इन्फिनिक्स कंपनीने देखील आपला नवा कोरा 5जी फोन लॉन्च केला आहे.
इन्फिनिक्स (Infinix) या ट्रांसियॉन ग्रुपच्या प्रिमिअम स्मार्टफोन ब्रॅण्डने भारतीय बाजारपेठेत आज त्यांचा पहिला 5जी स्मार्टफोन 'झीरो 5जी' (Zero 5G) लाँच केला आहे. इन्फिनिक्सने झीरो 5जी च्या चाचणीसाठी रिलायन्स जिओसोबत भागिदारी केली आहे. नवा बजेट 5जी स्मार्टफोन खरेदी करु इच्छिनाऱ्यांसाठी झीरो 5जी हा स्मार्टफोन एक चांगला पर्याय आहे.
फिचर्सचं काय?
फिचर्सचा विचार करता या फोनमध्ये फर्स्ट-इन-सेगमेंट मीडियाटेक डायमेन्सिटी 900 प्रोसेसर, 8 जीबी + 5 जीबी रॅम, 128 जीबी रॉम म्हणजेच इंटरनल मेमरी आणि भव्य अशी 5000 Mah बॅटरी क्षमता असणार आहे. ही बॅटरी देखील सुपरफास्ट चार्जिंगने चार्ज होणार असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.
किंमत किती?
या स्मार्टफोनमध्ये 13 5जी बॅण्ड्स आहेत, जे आतापर्यंतच्या कोणत्याही स्मार्टफोनमधील बॅण्ड्सच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. आधुनिक वैशिष्ट्ये असलेल्या या स्मार्टफोनची किंमत 19 हजार 999 रूपये इतकी आहे. दरम्यान हा स्मार्टफोन ऑनलाईन पद्धतीने विकत घेता येऊ शकतो. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.
हे देखील वाचा-
- Smart TV On Amazon : 55 इंचाच्या स्मार्ट टीव्हीची 'ही' आहे सर्वात स्वस्त डील, ऑफरमध्ये मिळतेय चक्क 20 हजारांपर्यंत सूट
- Electric Car: देशात सर्वाधिक विक्री होणारी 'ही' इलेक्ट्रिक कार महागली, जाणून घ्या नवीन किंमत
- पॉवरफुल मोटर अन् अॅडवान्स बॅटरी; भारतीय बाजारात लवकरच दाखल होणार 'ही' दमदार इलेक्ट्रिक स्कूटर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha