एक्स्प्लोर

Internet Speed In India: भारतात इंटरनेटचा वेग मंदावतोय; जगात पहिल्या 100 देशांतही समावेश नाही

Internet Speed In India: भारतात इंटरनेटचा स्पीड इतर देशांच्या तुलनेत मंदावत असल्याचे समोर आले आहे. ब्रॉडब्रॅण्ड स्पीडबाबत भारत पहिल्या 100 देशातही नाही.

Internet Speed In India: भारतात एकीकडे 5 जी इंटरनेटची (5G Internet) उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 5 जी इंटरनेटमुळे देशातील मोबाइल इंटरनेटमध्ये (Mobile Internet) क्रांती येईल असे दावे केले जात आहेत. तर, दुसऱ्या बाजूला भारतात सध्या वापरात असलेल्या इंटरनेटचा वेग कमालीचा मंदावला असल्याचे समोर आले आहे. वेगवान इंटरनेट असणाऱ्या देशांच्या यादीत पहिल्या 100 देशांतही भारताचा (Internet Speed In India) समावेश नाही. ग्लोबल स्पीड टेस्ट एजन्सी Ookla ने इंटरनेट स्पीडबाबत एक अहवाल जारी केला आहे. 

या अहवालानुसार, भारतात इंटरनेटचा वेग पूर्वीच्या तुलनेत सध्या कमी झाला आहे.  ग्लोबल इंटरनेट स्पीडच्या यादीत ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात भारताची पिछेहाट झाली आहे. ब्रॉडब्रॅण्ड आणि मोबाइल इंटरनेट या दोन्हीच्या वेगात भारताची घसरण झाली आहे. 

सप्टेंबर महिन्यात ब्रॉडब्रॅण्ड वेगाबाबत भारत 117 व्या स्थानाहून 118 व्या स्थानावर आला आहे. तर, मोबाइल इंटरनेट स्पीडबाबत भारत 78 व्या स्थानावरून  79 व्या स्थानावर आला आहे. 

ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात भारतातील मोबाइल डाउनलोड स्पीड चांगला झाला आहे. ऑगस्ट महिन्यात मोबाइल डाउनलोड स्पीड 13.52Mbps इतका होता. सप्टेंबर महिन्यात यात वाढ होऊन तो 13.87Mbps इतका झाला.

ब्रॉडब्रॅण्ड इंटरनेटचा स्पीडमध्ये सप्टेंबर महिन्यात वाढ झाली. ब्रॉडब्रॅण्ड इंटरनेट स्पीड हा 48.29Mbps हून 48.59Mbps इतका झाला. 

इंटरनेट स्पीडमध्ये हा देश अग्रसेर

इंटरनेट स्पीडच्या बाबतीत नॉर्वे देश पहिल्या स्थानावर आहे. मोबाइल इंटरनेटचा स्पीड नॉर्वेमध्ये सर्वाधिक आहे. एकूण ब्रॉडब्रॅण्ड स्पीडबाबत चिली अग्रसेर आहे. Ookla कडून दर महिन्याला इंटरनेट स्पीडचा डेटा जारी करण्यात येतो. हा डेटा लोकांकडून करण्यात येत असलेल्या Speed Test च्या आधारे तयार केला जातो.   

5 जी कडून आशा 

इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत हा सध्या इतर देशांच्या तुलनेत बराच मागे आहे. देशात सर्वाधिक 5जी नेटवर्क लाँच केले आहे. मात्र, 5 जी इंटरनेट सध्या मोजक्याच शहरात उपलब्ध होणार आहे.  5जी इंटरनेट सेवा पूर्णपणे सुरू झाल्यानंतर देशातील इंटरनेट स्पीडमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा आहे. तर, ब्रॉडब्रॅण्ड इंटरनेट स्पीडमध्ये भारत बराच मागे आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्य आग ओकतोय, आता तरी शाळेची वेळ कमी करा; डोक्यावर दप्तर ठेऊन चिमुरड्यांची प्रशासनाकडे आर्त हाक
सूर्य आग ओकतोय, आता तरी शाळेची वेळ कमी करा; डोक्यावर दप्तर ठेऊन चिमुरड्यांची प्रशासनाकडे आर्त हाक
Temperature Alert: नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
Udayanraje Bhosale on Nitesh Rane : मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Fadnavis vs Danve : शक्तिपीठ महामार्गाची गरज काय? देवेंद्र फडणवीसांनी समजावून सांगितलं!Devendra Fadnavis on Shaktipeeth : शक्तिपीठ महामार्ग का गरजेचा? मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं!Dada Khindkar: Dhananjay Deshmukh यांच्या साडूकडून युवकाला अमानुष मारहाण,VIDEO सोशल मिडियावर व्हायरलKrishna Andhale Nashik : संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशकात? CCTV

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्य आग ओकतोय, आता तरी शाळेची वेळ कमी करा; डोक्यावर दप्तर ठेऊन चिमुरड्यांची प्रशासनाकडे आर्त हाक
सूर्य आग ओकतोय, आता तरी शाळेची वेळ कमी करा; डोक्यावर दप्तर ठेऊन चिमुरड्यांची प्रशासनाकडे आर्त हाक
Temperature Alert: नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
Udayanraje Bhosale on Nitesh Rane : मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Shaktipeeth Expressway : मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
स्टॉक मार्केटच्या घसरण्यामागील 3 प्रमुख कारणे
स्टॉक मार्केटच्या घसरण्यामागील 3 प्रमुख कारणे
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, फडणवीस म्हणाले...
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, फडणवीस म्हणाले...
समृद्धी महामार्गानं गेलं की बायको घरी वाट बघते...एवढा बोगस रस्ता, वडेट्टीवारांचा हल्लाबोल, शक्तिपीठ महामार्गाला विरोध 
समृद्धी महामार्गानं गेलं की बायको घरी वाट बघते...एवढा बोगस रस्ता, वडेट्टीवारांचा हल्लाबोल, शक्तिपीठ महामार्गाला विरोध 
Embed widget