एक्स्प्लोर
सॅमसंगनंतर Huawei कंपनीनेही 'फोल्डेबल स्मार्टफोनचं लाँचिंग पुढे ढकललं
जून महिन्यात Huawei कंपनीचा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात होतं मात्र हे लाँचिंग पुढे ढकलण्यात आलं आहे.

BARCELONA, SPAIN - FEBRUARY 26: The new Huawei Mate X mobile phone is shown on display at the Huawei booth on day 2 of the GSMA Mobile World Congress 2019 on February 26, 2019 in Barcelona, Spain. The annual Mobile World Congress hosts some of the world's largest communications companies, with many unveiling their latest phones and wearables gadgets like foldable screens and the introduction of the 5G wireless networks. (Photo by David Ramos/Getty Images)
Huawei कंपनीने आपल्या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोनचं लाँचिंग पुढे ढकललं आहे. Huawei Mate X हा कंपनीचा फोल्डेबल स्मार्टफोन जून महिन्यात लाँच करण्यात येणार होता. परंतू आता ही तारीख सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
फेब्रुवारी महिन्यात झालेल्या वर्ल्ड मोबाईल काँग्रेसमध्ये Huawei Mate X हा फोन सर्वांसमोर आला होता. त्यानंतर कंपनीने जून महिन्यात हा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करणार असल्याचे सांगितले होते. परंतू हा फोन आणखी ग्राहकांच्या हातात देण्यासाठी पुर्णपणे तयार नसल्याचं सांगितलं जात आहे. कंपनीकडून या स्मार्टफोनच्या आणखी काही चाचण्या घेतल्या जात आहेत त्यामुळे याचं लाँचिंग पुढे ढकलण्यात आलं असल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वी सॅमसंगने देखील आपल्या फोल्डेबल स्मार्टफोनचं लाँचिंग पुढे ढकललं आहे. Galaxy Fold या सॅमसंगच्या स्मार्टफोनच्या डिस्प्लेमध्ये समस्या असल्याने कंपनीने लाँचिंग पुढे ढकलले आहे.
सध्या हुवावे कंपनीच्या उत्पादनांवर अमेरिकेत पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच अमिरिकन सरकारने गुगलला देखील हुवावेसोबत काम करण्यास मनाई केलेली आहे. त्यामुळे गुगलने हुवावेचा अँड्रॉइड सपोर्ट देखील काढून घेतला आहे. हुवावेडे मोबाईलसाठी स्वतःची ऑपरेटिंग सिस्टिम नसल्याने कंपनी नवीन फोनचं लाँचिंग पुढे ढकलत असल्याचा देखील अंदाज लावला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भारत
क्राईम
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
