Facebook: मोबाईल आणि कम्प्युटरवरून फेसबूक प्रोफाईल लॉक कसं करायचं? जाणून घ्या सोप्या टिप्स
Facebook: फेसबुक हा एक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जिथे लोक त्यांचा अधिकांश वेळ त्यांच्या ऑनलाईन मित्रांसह आणि इतर गोष्टींमध्ये घालवतात.
Facebook: फेसबुक हा एक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जिथे लोक त्यांचा अधिकांश वेळ त्यांच्या ऑनलाईन मित्रांसह आणि इतर गोष्टींमध्ये घालवतात. जगातली कोणतीही व्यक्ती, कुठूनही फेसबुकवरील आपली प्रोफाईल पाहू शकतो. आपली प्रोफाईल लॉक करुन ठेवण्याची सुविधा फेसबुकने दिली आहे. फेसबूक प्रोफाईल लॉक केल्यानं, जे लोक तुमच्या फेसबूक मित्रांच्या यादीत नाहीत. त्यांना तुमची फेसबूक प्रोफाईल दिसत नाही. लॉक केलेल्या प्रोफाईल टाइमलाइनवरील फोटो आणि पोस्ट, प्रोफाईल पिक्चर्स आणि कव्हर फोटो आणि नवीन पोस्ट्स फक्त तुमच्या फ्रेंडलिस्टमध्ये असलेल्या लोकांनाच दिसतील. तसेच, तुमच्या 'सार्वजनिक' पोस्ट यापुढे सार्वजनिक राहणार नाहीत आणि त्या फक्त तुमच्या फेसबूक मित्रांनाच दिसणार.
मोबाईल अॅपमधून फेसबूक प्रोफाईल लॉक कसं करायचं?
- सर्वप्रथम तुमच्या फोनवर फेसबुक अॅप उघडा आणि तुमच्या प्रोफाइलवर टॅप करा.'
- त्यानंतर अॅड टू स्टोरीनंतर येणाऱ्या 3 डॉट्सवर क्लिक करा.
- येथे तुम्हाला प्रोफाईल लॉक करण्याचा पर्याय मिळेल.
- पुढचा पेज स्क्रोल केल्यानंतर खाली प्रोफाइल लॉक करण्याचा पर्याय असेल, त्यावर टॅप करा.
- त्यावर टॅप केल्यावर एक पॉप अप होईल. ज्यात 'यू लॉक यूअर प्रोफाईल' असं लिहलेलं असेल. याचा अर्थ तुमचे प्रोफाईल लॉक झालंय.
कम्प्युटरद्वारे फेसबूक प्रोफाईल लॉक कसं करणार?
-सर्वप्रथम तुमच्या कम्प्युटरवरून https://www.facebook.com/ संकेत स्थळाला भेट द्या.
-त्यानंतर तुमचा आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करा.
-तुमच्या प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करा
- यूआरएलमध्ये WWW ला M नं बदला. ज्यानंतर युआरएलमध्ये m.facebook.com/yourprofilename असं दिसेल.
- ही यूआरएल लिंक तुम्हाला डेस्कटॉप ब्राउझरवरील फेसबूक मोबाईल व्हर्जनवर घेऊन जाईन.
- येथे तुम्हाला एडीट प्रोफाईलचा पर्याय दिसेल. ज्यावर क्लिक करून फेसबूक प्रोफाईल लॉक करता येईल.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
- Gulabrao Patil Apologized: 'गुलाबी गालांबद्दलचं 'ते' वक्तव्य भोवलं, गुलाबराव पाटील यांनी मागितली माफी
- '18 तास काम करुन मोदीसाहेब देशाला आत्मनिर्भर करत आहेत'; नारायण राणेंची पंतप्रधानांवर स्तुतीसुमनं
- Amit Shah : 'केंद्राने पेट्रोल स्वस्त केलं तर महाराष्ट्र सरकारने दारु स्वस्त केली, पुण्यातून अमित शाहांचा हल्लाबोल