Honda SUV : भारतात लवकरच होंडा लाँच करणार 'या' दोन एसयूव्ही
Honda SUV For India: होंडा लवकरच भारतीय बाजारपेठेत दोन एसयूव्ही कार लाँच करणार आहे.
Honda SUV For India: इंडोनेशियात सुरू असलेल्या मोटर शोमध्ये सुरू असलेल्या कार प्रदर्शनात भारतीय बाजारपेठेच्या दृष्टीने अनेक गोष्टी दिसून आल्यात. होंडा कंपनीने एक नवीन एसयूव्ही कार संकल्पना मांडली. ही एसयूव्ही भविष्यातील एसयूव्ही कार असणार असून भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात येणार आहे. या कार एसयूव्ही आरएस संकल्पनेशी निगडित आहे. सध्या फ्युचरिस्टिक शो कार आहे, परंतु ती ZR-V म्हणून ओळखली जाणारी एसयूव्ही कार असणार आहे. स्पोर्टी क्रेटा/सेल्टोस प्रतिस्पर्धी असण्यासोबतच, ZR-V ही संकल्पनेची निर्मिती आवृत्ती असेल.
होंडाने ती अधिक स्पोर्टी आणि आकर्षक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. या कारची डिझाइन इतर कारपेक्षा वेगळी असणार आहे. ZR-V ही एक चांगली दिसणारी कार असणार आहे. मोठी चाके, मॅचिंग हेडलॅम्प क्लॅडिंग, रूफ-रेल्स आणि ग्रिल सोबत शार्प कट फॉग-लॅम्प एन्क्लोजर सारखे डिटेलिंग असणार आहे.
दुसरी नवीन SUV कार BR-V आहे. ही कार मागील कारपेक्षा अधिक चांगली आहे. BR-V ही अधिक व्यावहारिक एसयूव्ही आहे. ही एसयूव्ही कार दिसण्यास अधिक चांगली असून आता अधिक तंत्रज्ञानासह आधुनिक इंटीरियर देण्यात आले आहे. ही कार भारतीय बाजारपेठेतील एमपीव्ही आणि अन्य एसयूव्ही कारसोबत स्पर्धा करू शकते. नवीन पिढीच्या मॉडेलमध्ये Honda City सारखी लेन-वॉच वैशिष्ट्ये आणि नवीन टचस्क्रीन आहे. ADAS वैशिष्ट्यांसह क्रूझ कंट्रोलदेखील आहे.
या दोन नवीन Honda SUV भारतासाठी महत्त्वाच्या आहेत आणि Honda 2023 च्या सुरुवातीला एक SUV भारतीय बाजारात लाँच होणार आहे. मात्र, ही कार त्याआधीच लाँच होण्याची शक्यता आहे. कॉम्पॅक्ट SUV ही सध्या खूप असून होंडाच्या कारला एसयूव्ही बाजारपेठेत स्थान मिळू शकते.
संबंधित वृत्त:
बॅटरीशिवाय फक्त 50 हजार रुपयांत खरेदी करता येणार ई-स्कूटर; 'या' कंपनीची खास ऑफर
'या' कारणांमुळे स्मार्टफोनचे होतात स्फोट; असा करा उपाय
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha