एक्स्प्लोर

बॅटरीशिवाय फक्त 50 हजार रुपयांत खरेदी करता येणार ई-स्कूटर; 'या' कंपनीची खास ऑफर

New E-Scooter Launch: बेंगळुरूची नवीन स्टार्टअप कंपनी Bounce Electric लवकरच आपली ई-स्कूटर बाजारात दाखल करणार आहे. कंपनीने ग्राहकांना खास ऑफरही देऊ केली आहे.

Cheapest E-Scooter : भारतात इलेक्ट्रीक स्कूटरची बाजारपेठ वाढत आहे. अनेक नवीन कंपन्या नवीन फिचर्ससह ई-स्कूटर लाँच करत आहेत. आता त्यामध्ये बेंगळुरूची एक स्टार्ट-अप कंपनी जबरदस्त फिचर्ससह आपली ई-स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत आहे. Bounce Electric ही कंपनी लवकरच प्री-बुकिंग सुरू करणार आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफरही लाँच करणार आहे. त्यानुसार ही ई-स्कूटर बॅटरीशिवाय खरेदी करता येणार आहे. त्यामुळे ही स्कूटर स्वस्त दरात खरेदी करता येणार आहे. 

40 टक्क्यांपर्यंत किंमतीत घट

Bounce ने म्हटले की, त्यांच्या ई-स्कूटरमध्ये बॅटरी स्वॅपिंगची सुविधा असणार आहे. बॅटरी संपल्यानंतर ती बॅटरी काढून दुसरी बॅटरी काढता येऊ शकते. जे ग्राहक ही ई-स्कूटर बॅटरीशिवाय खरेदी करणार आहेत. त्यांना कंपनीकडून भाडेतत्वावर बॅटरी मिळू शकते. त्यामुळे ग्राहकांना बॅटरीची किंमत द्यावी लागणार नाही. या खास ऑफरमुळे स्कूटरची किंमत जवळपास 40 टक्क्यांनी कमी होणार आहे. या खास ऑफरमुळे ई-स्कूटरची किंमत 65 हजाराच्या आसपास  असणार आहे. 

हे आहेत खास फिचर्स

गोल ऑल-LED हेडलॅम्प, एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल देऊन ई-स्कूटरला चांगला लूक देण्याचा प्रयत्न केला. स्कूटरमध्ये फ्रंट आणि रिअर दोन्ही ठिकाणी डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.  कंपनीने स्कूटरमध्ये 2.1kWhची बॅटरी देण्याची शक्यता आहे. लवकरच कंपनीकडून या स्कूटरसाठी प्री-बुकिंग सुरू करण्यात येणार आहे. जानेवारी 2022 पासून डिलीव्हरी सुरू करण्यात येणार आहे. कंपनीने स्कूटरच्या किंमतीबाबत अद्याप अधिकृतपणे स्पष्ट केले नाही. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात याची किंमत जाहीर होण्याची शक्यता आहे. 

या ई-स्कूटर्ससोबत स्पर्धा

Bounce च्या ई-स्कूटरचा सामना TVS iQube, Ola S1, Ola S1 Pro, Bajaj, Hero, Pure Motors सोबत होईल. या सर्व ई-स्कूटरमध्ये चांगले फिचर्स असून त्यांची किंमत एक लाखापेक्षा कमी आहे. त्याशिवाय पुढील वर्षी Honda, Hero आणि सुझुकीदेखील आपल्या ई-स्कूटर बाजारपेठेत दाखल करण्याची शक्यता आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Resignation Demand : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, अजितदादांकडून बचाव?Ajit Pawar Full PC : बीड प्रकरणातील दोषींना फाशी होणार, कुणाचा संबध नसेल तर...UNCUT PCTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 28 January 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
Embed widget