एक्स्प्लोर

हिरो मोटोकॉर्पकडून 'Hero Xpulse 200 4V'च्‍या पुढील बॅचच्या ऑनलाईन बुकिंगला सुरूवात

Hero Xpulse 200 4V bookings reopened: हिरो मोटोकॉर्पच्या एक्सपल्स 200 4 वॉल्व्हच्या पहिल्या बॅचची संपूर्ण विक्री झाल्यानंतर कंपनीनं पुढील बॅचच्या ऑनलाईन बुकिंगला सुरुवात झालीय.

Hero Xpulse 200 4V bookings reopened: हिरो मोटोकॉर्पच्या एक्सपल्स 200 4 वॉल्व्हच्या पहिल्या बॅचची संपूर्ण विक्री झाल्यानंतर कंपनीनं पुढील बॅचच्या ऑनलाईन बुकिंगला सुरुवात झालीय. ग्राहक आता कंपनीचे ऑनलाइन विक्री व्‍यासपीठ ईशॉप (eSHOP) वर मोटरसायकल बुक करू शकतात. या बाईकची दिल्ली एक्स शोरूममध्ये 1 लाख 30 हजार 150 रुपये किंमत आहे. युजर-अनुकूल यंत्रणा ग्राहकांना निर्णय घेणे, वेईकल खरेदी करणे आणि डिलिव्‍हरी घेणे अशा सर्व संबंधित पाय-यांमध्‍ये मार्गदर्शन करते. ही मोटरसायकल 200 सीसी, बीएस-6 4 वॉल्व्ह ऑइल कूल्ड इंजिनसोबत येते. हे इंजिन 6 टक्‍के जास्त शक्‍ती आणि 5 टक्‍के अतिरिक्‍त टॉर्क जनरेट करते.

इंजिन
एक्सपल्स 200 बीएस-6 200 सीसी 4 वॉल्व्ह ऑइल कूल्ड इंजिनाने युक्‍त आहे. या इंजिनमधून 8500 आरपीएमवर 19.1 पीएसची शक्‍ती आणि 6500 आरपीएमवर 17.35 एनएम टॉर्क निर्माण होतो. 4 वॉल्व्ह ऑइल कूल्ड इंजिन मध्यम व उच्‍च वेगाच्या श्रेणीत उत्तम शक्‍ती देण्‍यासोबत अत्यंत उच्‍च वेगावरही तणावमुक्‍त इंजिन कामगिरी देते आणि व्हायब्रेशन्स नियंत्रणात ठेवते. प्रचंड ट्रॅफिकमध्ये उष्णतेच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी कूलिंग यंत्रणा आता 7 फिन ऑइल कूलरने अद्ययावत केलेली आहे. एक्सपल्स 200 4 व्हीमधील मोठ्या प्रमाणावर सुधारलेले ट्रान्समिशन चांगली शक्‍ती व टिकाऊपणा देते. गिअरचे प्रमाण अधिक ट्रॅक्टिव्ह कार्य आणि अॅक्सलरेशनसाठी अद्ययावत केलेले आहे. 

आरामदायक प्रवास-
अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्‍त एक्सपल्स 200 4 व्ही लांबच्‍या प्रवासादरम्‍यान आरामदायी राइडची हमी देते. अद्ययावत एलईडी हेडलाइटमुळे रात्रीच्या वेळी अधिक सुस्‍पष्‍ट दृश्यमानता मिळते, ज्‍यामुळे रस्‍त्‍यावर एकसमान प्रकाश दिसण्‍याची खात्री मिळते.  या मोटरसायकलमध्‍ये सेगमेंट-फर्स्‍ट वैशिष्‍ट्ये कायम ठेवण्‍यात आली आहेत- जसे स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह पूर्णपणे डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर व कॉल अलर्ट्स, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, गिअर इंडिकेटर, इको मोड आणि दोन ट्रिप मीटर व प्रमाणित ऑफरिंग म्‍हणून सिंगल चॅनल एबीएस. 

सुरक्षित प्रवास-
सर्व प्रकारच्या प्रदेशांवर साम्राज्य करण्याच्या ध्येयाने प्रेरित या मोटरसायकलमध्ये दीर्घ सस्पेंशन ट्रॅव्हल आहे- 190 मिमी फ्रंट व 170 मिमी रिअर आणि त्याचबरोबर 21 इंच फ्रंट व 18 इंच रिअर स्पोक व्हील्स आहेत. खडकाळ व अवघड प्रदेशात अडथळ्यांपासून मुक्‍त राइडची हमी देण्यासाठी मोटरसायकलमध्ये अॅल्युमिनियम स्किड प्लेट्स आहेत, ज्‍या इंजिनचे रक्षण करतात. जास्तीत-जास्त ग्रिप आणि नियंत्रणासाठी नवीन टोकदार ब्रेक पॅनल आहे आणि खोल पाण्यातून जाण्यासाठी वरच्या बाजूला एक्झॉस्ट लावलेला आहे. 

उत्तर रायडिंग अनुभव
दुहेरी उद्दिष्ट टायर्स, 10 स्टेप अॅडजस्टेबल मोनो शॉक सस्पेंशन, 825 मिमी सीटची उंची आणि 220 मिमीचा जास्त ग्राऊंड क्लिअरन्स ही वैशिष्‍ट्ये साहसी प्रवाशासाठी उत्तम पॅकेज देतात. उत्तमरित्या तयार केलेल्या चॅसिसमुळे एक्सपल्स 200 4 व्ही दैनंदिन प्रवास असो किंवा गावातील रस्त्यांवरून आनंदासाठी प्रवास करायचा असो किंवा ऑफ-रोड प्रदेशात ड्रायव्हिंग करायचे असो उत्तम रायडिंग अनुभव मिळण्‍याची खात्री  देते.  

आरामदायी सीट
अद्ययावत प्रवास क्षमतेसाठी मोटरसायकलमध्ये लगेज प्लेट आणि बंजी हुक्स देण्यात आले आहेत. त्यामुळे पिलियन रायडरसोबत सामानही वाहून नेता येईल. सुधारित सीट आरामदायीपणामुळे प्रत्येक किलोमीटर अधिक आनंददायी आणि सहजपणे पार होतो. संरक्षक विंडशील्डमुळे उत्तम वारा आणि हवामान संरक्षण तसेच एकूणच चांगला रायडिंगचा आनंद मिळतो. यूएसबी चार्जरमुळे रायडरला संपूर्ण प्रवासात कनेक्टेड राहता येते आणि पुढील व मागील पेडल डिस्क ब्रेक्स ब्रेकिंग सहजसोपे करतात. 

आकर्षक रंगांचे पर्याय
साहस आणि ऑफ-रोडच्या उत्साहाने सज्ज असलेली नवीन एक्सपल्स 200 4व्ही मोटरसायकल तीन नवीन आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये येते - ट्रेल ब्लू, ब्लिट्झ ब्‍ल्‍यू आणि रेड रेड. त्यामुळे ही मोटरसायकल लोकांचे लक्ष सहजपणे वेधून घेते.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget