Iphone : आयफोनमध्ये ऑरेंज डॉट दिसतोय? ऑरेंज आणि ग्रीन डॉट्सचा अर्थ नेमका काय? वाचा सविस्तर
Iphone Orange-Green Dot : आयफोन वापरताना तुमच्या फोनमध्ये दिसणाऱ्या ऑरेंज आणि ग्रीन डॉटकडे कधी तुमचं लक्ष गेलंय का? आयफोनशी संबंधित या डॉट्सबद्दल माहिती वाचा.
Iphone Orange-Green Dot : आयफोन (Iphone) वापरणाऱ्या यूजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बेस्ट कॅमेरा फिचर्स (Camera Features), सुरक्षिततेची हमी (Security) आणि एकंदरीतच त्याचा लूक (Look) पाहून तरूणाईपासून अनेक लोक या फोनकडे आकर्षित होतात. तुमच्यापैकीही अनेकजण आयफोन वापरत असतील. पण हा आयफोन वापरताना तुमच्या फोनमध्ये दिसणाऱ्या ऑरेंज आणि ग्रीन डॉटकडे कधी तुमचं लक्ष गेलंय का? आपल्या फोनमध्ये हे डॉट का येतात? यामागचा अर्थ नेमका काय? असे प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला याच आयफोनशी संबंधित या डॉट्सबद्दल माहिती सांगणार आहोत.
तुमच्या आयफोनमध्ये दिसणारा ऑरेंज डॉट (Orange Dots) :
समजा, जर तुमच्या आयफोनमध्ये ऑरेंज डॉट तुम्हाला दिसला तर यामगे असा अर्थ सूचित होतो की, तुमचा आयफोन मायक्रोफोन (Microphone) एका अॅपद्वारे वापरला जात आहे. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही व्हॉईस मेमो वापरता तेव्हासुद्धा तुम्हाला हे चिन्ह दिसून येईल. तुम्ही तुमचा कॅमेरा बंद केल्यानंतर किंवा तुम्ही कोणतेही अॅप वापरत असाल जे केवळ तुमचा आवाज रेकॉर्ड करत असेल तेव्हासुद्धा तुम्हाला आयफोनमध्ये ऑरेंज डॉट दिसेल.
तुमच्या आयफोनमध्ये दिसणारा ग्रीन डॉट (Green Dots) :
समजा, जर तुमच्या आयफोनमध्ये तुम्हाला ग्रीन डॉट दिसला तर त्यामागे असा अर्थ स्पष्ट होतो की, तुमचा आयफोन कॅमेरा (Camera) एका अॅपद्वारे वापरला जात आहे. तुमचा कॅमेरा ओपन करताना, किंवा Instagram, Snapchat वापरताना तुम्हाला हा ग्रीन डॉट दिसेल. किंवा तुम्हाला फोटो काढण्याची आणि पोस्ट करण्याची परवानगी देणारे कोणतेही सोशल मीडिया अॅपवर फोटो घेताना तुम्हाला हा ग्रीन डॉट दिसेल.
टीप : खरंतर, तुमच्या आयफोनमधील ऑरेंज डॉट आणि ग्रीन डॉट या दोन्हींपैकी कोणताही डॉट घातक असा नाही. मात्र, यूजर्सना या डॉट्सच्या संदर्भात योग्य माहिती मिळावी तसेच आपल्या फोनचा कोणी गैरवापर करत नाही ना यासाठी ही माहिती होती.
महत्वाच्या बातम्या :