एक्स्प्लोर
सेवानिवृत्त होत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खास अॅप
या अॅपमुळे कर्मचारी त्यांच्या पेंशनसंबंधित प्रकरणांचा आढावा आणि स्थिती जाणून घेऊ शकतील.
नवी दिल्ली : सेवानिवृत्त होत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकार बुधवारी खास अॅप लाँच करणार आहे. या अॅपमुळे कर्मचारी त्यांच्या पेंशनसंबंधित प्रकरणांचा आढावा आणि स्थिती जाणून घेऊ शकतील. सरकारकडून पत्रक जारी करुन याबाबत माहिती देण्यात आली आहे.
सेवानिवृत्त कर्मचारी पेंशन कॅलक्युलेटरच्या माध्यमातून रिटायरमेंट फंड आणि तक्रारींची स्थिती जाणून घेऊ शकतात, असं सरकारने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. हे अॅप कर्मचाऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर वापरता येईल. त्यामुळे तक्रार निवारणासाठी याचा विशेष फायदा होणार आहे.
कामगार आणि निवृत्ती वेतन कल्याण विभागाच्या पोर्टलवर सध्या पेंशनधारकांसाठी अगोदरपासूनच सर्व सुविधा मोबाईलवर दिल्या जातात. सेवानिवृत्तीपूर्वी केंद्र सरकारच्या 300 कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळेचंही आयोजन करण्यात आलं आहे. सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या योजनांची माहिती करुन देणं या कार्यशाळेचा हेतू आहे, असं सरकारकडून सांगण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement