एक्स्प्लोर
Advertisement
रिलायन्स जिओने जाहिरातीत मोदींचा फोटो वापरल्याने दंड?
नवी दिल्ली : रिलायन्स जिओ सिमच्या जाहिरातीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरल्यामुळे कंपनीला 500 रुपये दंड होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय प्रतिक चिन्हं आणि नावांचा परवानगीशिवाय वापर करणं कायद्याने गुन्हा मानला जातो. यासाठी 1950 साली कायदा अस्तित्वात आणण्यात आला.
जाहिरातीवर पंतप्रधान मोदींचा फोटो वापरण्यासाठी पीएमओकडून कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र रिलायन्सकडून अजून यावर कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही, असं उत्तर माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी सभागृहात दिलं.
रिलायन्स जिओने जाहिरातीसाठी मोदींचा फोटो वापरल्याने विरोधी पक्षांनी त्यावर टीका केली. त्यानंतर रिलायन्सने फोटो वापरण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं.
पेटीएमकडूनही मोदींच्या फोटोचा वापर
दरम्यान नोटाबंदीनंतर पेटीएमनेही जाहिरातीसाठी पंतप्रधान मोदींच्या फोटोंचा वापर केला होता. 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बंद झाल्यानतंर पेटीएमच्या व्यवसायात 435 टक्क्यांनी वाढ झाली होती. त्यामुळे पेटीएमने मोदींच्या फोटोंसह अनेक मोठ्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिली होती.
विरोधकांनी यावरुन टीका केल्यानंतर राज्यवर्धन सिंह यांनी सभागृहात लेखी प्रश्नाला उत्तर दिलं. मोदींचा फोटो वापरल्यानंतर आतापर्यंत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. जाहिरातीमध्ये कायद्याचं उल्लंघन झाल्याचं आढळल्यास कारवाई केली जाईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement