एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एलईडी बल्बपाठोपाठ ट्युबलाईट आणि पंखे देखील बाजारात!
मुंबई: एलईडी बल्बला देशभरातून मिळालेल्या प्रतिसादामुळे आता सरकारनं एलईडी ट्युबलाइट आणि पंखे बाजारात आणले आहेत. ब्रॅण्डेड कंपनीच्या ट्युबलाईट आणि पंख्यांपेक्षा सरकारनं आणलेले हे नवे प्रोडक्ट स्वस्त असणार आहे.
वीज बचतीसाठी केंद्र सरकारनं उजाला योजनेअंतर्गत एलईडी बल्बची विक्री सुरु केली. याला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच आता सरकारनं एलईडी ट्युबलाईट आणि पंखे विक्रीची निर्णय घेतला आहे. पण यामुळे बरीच वीज बचत होणार आहे.
एलईडी ट्युबलाईट तब्बल 64% तर पंखा 50% वीजबचत करेल असा सरकारनं दावा केला आहे. सरकारनं बाजारात आणलेल्या या एलईडी ट्युबलाईटची किंमत 230 रु. आहे. तर पंख्याची किंमत 1150 रु. आहे. सध्या मध्यप्रदेशमध्ये याची विक्री सुरु करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement