एक्स्प्लोर
गुगल पिक्सेल 2 XL ची विक्री सुरु, किंमत आणि फीचर्स
या फोनची किंमत भारतात 73 हजार रुपयांपासून सुरु होईल. या किंमतीत ग्राहकांना 64GB व्हेरिएंट खरेदी करता येईल. तर 128GB व्हेरिएंटची किंमत 82 हजार रुपये आहे.
नवी दिल्ली : गुगलचा फ्लॅगशिप स्मार्टफोन पिक्सेल 2XL ची विक्री भारतात बुधवारपासून सुरु झाली आहे. हा फोन फ्लिपकार्ट आणि भारतातील काही निवडक स्टोअर्समध्ये उपलब्ध झाला आहे. रिलायन्स डिजिटल, क्रोमा, विजय सेल्स या स्टोअर्समध्ये हा फोन खरेदी करता येईल.
गुगल पिक्सेल 2 2 नोव्हेंबरपासूनच भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. मात्र पिक्सेल 2XL ची विक्री सुरु होण्याची प्रतिक्षा होती. या फोनची किंमत भारतात 73 हजार रुपयांपासून सुरु होईल. या किंमतीत ग्राहकांना 64GB व्हेरिएंट खरेदी करता येईल. तर 128GB व्हेरिएंटची किंमत 82 हजार रुपये आहे.
गुगल पिक्सेल 2 च्या 64GB व्हेरिएंटची किंमत 61 हजार रुपये, तर 128GB व्हेरिएंटची किंमत 70 हजार रुपये आहे.
पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL चे फीचर्स
पिक्सेल 2 मध्ये जुन्या पिक्सेल फोनप्रमाणेच 5 इंच आकाराची स्क्रीन देण्यात आली आहे. तर पिक्सेल 2 XL मध्ये 6 इंच आकाराची स्क्रीन आहे. हे फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असतील. 64GB आणि 128GB व्हेरिएंटमध्ये हे फोन तुम्हाला खरेदी करता येतील. दोन्ही फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर आणि 4GB रॅम देण्यात आली आहे.
कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य काय?
पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL वॉटरप्रूफ डिझाईनसह IP 67 सर्टिफाईड आहेत. कॅमेरा हे या फोनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. या फोनमध्ये ड्युअल सेन्सर टेक्निक देण्यात आली आहे. शिवाय पिक्सेल 2 मध्ये स्पेशल पोर्ट्रेट मोडही देण्यात आला आहे.
दोन्ही फोनमध्ये 12.2 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आहे. तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.
फोनमध्ये ई-सिम सपोर्ट देण्यात आला आहे. म्हणजेच फोनमध्ये इंटिग्रेटेड सिम असतील. अँड्रॉईडची लेटेस्ट ओरियो 8.0 ही सिस्टम या फोनमध्ये असेल. चांगल्या साऊंड क्वालिटीसाठी स्टेरियो स्पीकर देण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
गुगल पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL लाँच, किंमत आणि फीचर्स
भारतात गुगल पिक्सेल 2 ची विक्री सुरु, किंमत आणि फीचर्स
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement