एक्स्प्लोर
गुगल पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL लाँच, किंमत आणि फीचर्स
पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL 26 ऑक्टोबरपासून प्री बुकिंगसाठी उपलब्ध होतील. या फोनची ऑनलाईन बुकिंग फ्लिपकार्टवर करता येईल.
नवी दिल्ली : गुगलने पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL हे हायटेक फीचर्स स्मार्टफोन लाँच केले. गुगलने एचटीसीसोबत दोन्ही स्मार्टफोन तयार केले आहेत. फीचर्स पाहता हे फोन अॅपलच्या आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसला टक्कर देण्याची शक्यता आहे.
भारतातील किंमत किती?
भारतात पिक्सेल 2 ची किंमत 61 हजार रुपयांपासून सुरु होईल. तर या फोनच्या 128GB व्हेरिएंटची किमत 70 हजार रुपये असेल. पिक्सेल 2 XL ची किंमत 73 हजार रुपयांपासून सुरु होईल. तर 128GB व्हेरिएंटची किंमत 83 हजार रुपये असेल.
पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL 26 ऑक्टोबरपासून प्री बुकिंगसाठी उपलब्ध होतील. या फोनची ऑनलाईन बुकिंग फ्लिपकार्टवर करता येईल. शिवाय ऑफलाईन स्टोअर्समध्येही हा फोन उपलब्ध असेल. 1 नोव्हेंबरपासून पिक्सेल 2 ची, तर 15 नोव्हेंबरपासून पिक्सेल 2 XL ची विक्री सुरु होईल.
पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL चे फीचर्स
पिक्सेल 2 मध्ये जुन्या पिक्सेल फोनप्रमाणेच 5 इंच आकाराची स्क्रीन देण्यात आली आहे. तर पिक्सेल 2 XL मध्ये 6 इंच आकाराची स्क्रीन आहे. हे फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असतील. 64GB आणि 128GB व्हेरिएंटमध्ये हे फोन तुम्हाला खरेदी करता येतील. दोन्ही फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर आणि 4GB रॅम देण्यात आली आहे.
कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य काय?
पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL वॉटरप्रूफ डिझाईनसह IP 67 सर्टिफाईड आहेत. कॅमेरा हे या फोनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. या फोनमध्ये ड्युअल सेन्सर टेक्निक देण्यात आली आहे. शिवाय पिक्सेल 2 मध्ये स्पेशल पोर्ट्रेट मोडही देण्यात आला आहे.
दोन्ही फोनमध्ये 12.2 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आहे. तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.
फोनमध्ये ई-सिम सपोर्ट देण्यात आला आहे. म्हणजेच फोनमध्ये इंटिग्रेटेड सिम असतील. अँड्रॉईडची लेटेस्ट ओरियो 8.0 ही सिस्टम या फोनमध्ये असेल. चांगल्या साऊंड क्वालिटीसाठी स्टेरियो स्पीकर देण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नाशिक
क्राईम
Advertisement