एक्स्प्लोर
गूगलने सांगितली 'अर्थ डे'ची अनोखी कथा...
नवी दिल्ली : आपण सर्वांनीच जागतिक पृथ्वी दिनाविषयी शालेय पुस्तकात वाचलं असेल, याच कथेला पुन्हा उजाळा देण्याचं काम काल गूगलनं केलं आहे.
गूगलने काल 22 एप्रिल रोजी जागतिक पृथ्वी दिनानिमित्त चित्रांच्या माध्यमातून वातावरण बदलाविषयीची माहिती दिली.
गूगलच्या या कार्टून फिल्ममध्ये एक कोल्हा झोपेत स्वप्न पाहतो. या स्वप्नात वातावरण बदलामुळे हिमनग वितळण्यास सुरुवात झाली आहे, आणि त्यामुळे नद्यांना आलेल्या महापुरात लाखो जीव मृत्यूमुखी पडत असल्याचं तो पाहतो.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचं संतुलन बिघडत असल्याचं जाणिव होऊन, तो कोल्हा जनजागृतीच्या कामाला लागतो.
यासाठी तो आपल्या सर्व मित्रांना पृथ्वीला पुन्हा हिरवेगार करण्यासाठी, आणि डोंगरांचे संरक्षण करण्यासाठी चर्चा करु लागतो. यामागे त्याचा मुख्य उद्देश शुद्ध हवामान आणि पृथ्वीला पुन्हा हिरवीगार बनवण्याचा असल्याचं यातून दाखवलं आहे.
पर्यावरणाच्या संतुलनासाठी कोल्हा आपला मित्र बेडूक आणि मांजराला पर्यावरण संरक्षणाचे धडे देताना दाखवलं आहे.
पर्यावरणचं जतन केल्याने आपला देश सजलाम, सुफलाम होईल, तसेच यामुळे शुद्ध हवा, पाणी मिळेल, असं सांगितलं आहे.
गूगलच्या या चित्रांचे लाखो जणांनी कौतुक केलं आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी 22 एप्रिल 1970 रोजी अमेरिकेचे सीनेटर जेराल्ड नेल्सन यांनी एक कार्यक्रम राबवला.
राष्ट्रीय समन्वयक असलेला डेनिस हेस याने स्थापलेल्या संस्थेने 1990 मध्ये 141 देशात या दिवसाचे आयोजन करून पृथ्वी दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला.
यानंतर 2009 साली संयुक्त राष्ट्र संघाने या दिवसाला जागतिक पृथ्वी दिन साजरा करण्यास मान्यता दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement