Pizza Google Doodle : आज पिझ्झा का होतोय ट्रेंड? गुगलनंही बनवलंय भन्नाट डूडल!
Pizza Google Doodle : वेगवगेळ्या प्रकारचे पिझ्झा सध्या लोकांच्या पसंतीस पडत आहेत.
Today Google Doodle Celebrating Pizza : लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत अनेकांना पिझ्झा (Pizza) खायला आवडतो. वेगवगेळ्या प्रकारचे पिझ्झा सध्या लोकांच्या पसंतीस पडत आहेत. Margherita पिझ्झा, एक्स्ट्रा चिझ पिझ्झा आणि पनीर पिझ्झा या पिझ्झाच्या प्रकारांना लोकांची विशेष पसंती मिळते. अनेक जण पार्टीला किंवा समारंभाला पिझ्झा ऑनलाइन पद्धतीने ऑर्डर करतात. वेगवेगळ्या टॉपिंग्सचा वापर करून पिझ्झा तयार केला जातो. सर्च इंजन गुगल (Google)आज (6 डिसेंबर) पिझ्झा डे साजरा करत आहे. या पिझ्झा डेसाठी त्यांनी खास डूडल (Doodle) तयार केले आहे. जाणून घेऊयात या डूडलबद्दल-
गुगल डूडलची खास गेम
गुगलने खास डूडल तयार केले आहे. या डूडलमध्ये त्यांनी पॉप्यूलर 'पिझ्झा मेन्यू' ची माहिती दिली आहे. या डूडलवर तुम्ही क्लिक केले की एका व्हिडीओ प्ले होतो. तो व्हिडीओ प्ले झाल्यानंतर तुम्ही एक गेम खेळू शकता. या गेममध्ये तुम्हाला एका पिझ्झाचे तुकडे (स्लाइज) कापायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला स्टार रेटिंग दिली जाते.
Today’s interactive #GoogleDoodle celebrates one of the world’s most popular dishes - pizza! 🍕On this day in 2007, the culinary art of Neapolitan “Pizzaiuolo” was inscribed on the UNESCO Representative List of the Intangible Cultural Heritage of Humanity. @GoogleDoodles pic.twitter.com/sPSFQ7Zwtb
— googledownunder (@googledownunder) December 6, 2021
का खास आहे आजचे Google Doodle?
आजचे पिझ्झा गुगल डूडल खास आहे कारण 06 डिसेंबर 2007 रोजी नेपोलिटन "पिझियुलो" रेसिपी ही युनेस्कोच्या प्रतिनिधी यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली होती.
गेममध्ये Googleने दिलेले पिझ्झा आणि त्यावरचे टॉपिंग्स
पेपरोनी पिझ्झा- (चीज, पेपरोनी)
व्हाईट पिझ्झा- (चीज, व्हाईट सॉस, मशरूम, ब्रोकोली)
Calabrese पिझ्झा- (चीज, Calabrese, कांदा, काळे ऑलिव्ह)
Margherita पिझ्झा-(चीज, टोमॅटो, तुळस)
मोझारेला पिझ्झा- (चीज, ओरेगॅनो, संपूर्ण ग्रीन ऑलिव्ह)
हवाईयन पिझ्झा -(चीज, हॅम, अननस)
मॅग्यारोस पिझ्झा- (चीज, सलामी, बेकन, कांदा, मिरची)
तेरियाकी मेयोनेझ पिझ्झा- (चीज, तेरियाकी चिकन, सीवीड, मेयोनेझ)
टॉम यम पिझ्झा -(चीज, कोळंबी, मशरूम, मिरची मिरची, लिंबाची पाने)
पनीर टिक्का पिझ्झा- (पनीर, शिमला मिरची, कांदा, पेपरिका)
डेजर्ट पिझ्झा
इतर बातम्या :
- Wifi Router : तुमचा वायफाय राऊटर धोक्यात?, 'या' कंपन्यांची नावं हॅकर्सच्या यादीत
- New Volvo XC60 Review: व्होल्वोची नवी XC60 SUV, नव्या दमदार फिचर्ससह आरामदायी प्रवास