एक्स्प्लोर

Paytm द्वारे रोज 30 ते 40 ग्राहकांची फसवणूक; अशी घ्या काळजी

पेटीएम या ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून दररोज 30 ते 40 जणांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. यासंबंधी कंपनीने ग्राहकांना आवाहन केले आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. यात खासकरुन पेटीएमच्या ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी जास्त आहेत. या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूजने पेटीएमशी संपर्क साधून याबद्दल जाणून घेतले. याविषयी माहिती देताना त्यांनी फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी पेटीएमच्या ग्राहकांना आवाहन केले आहे. गेल्या 2 महिन्यांपासून पेटीएम ग्राहकांची फसवणूक झाल्याचे प्रकार वाढले असल्याची कबुली पेटीएम पेमेंट्स बँकचे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट सुमित सोमानी यांनी एबीपी न्यूजशी बोलताना दिली. मागील 2 महिन्यांपासून ग्राहकांच्या फसवणुकीच्या सख्येत सातत्याने वाढ होत आहे. पेटीएमला दररोज 30 ते 40 ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक झाल्याच्या तक्रारी येत आहे. या तक्रारी जास्तकरुन दिल्ली, मुंबई, अशा मोठ्या शहरातून येत असल्याचे सोमानी यांनी सांगितले. अशी होते ऑनलाईन फसवणूक पेटीएम केवायसीच्या नावाखाली ग्राहकांची सातत्याने फसवणूक होत आहे. यात केवायसीची मर्यादा संपल्याचा फोन ग्राहकांना करुन मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर मागितला जातो. अनेक लोकांना लाखोंचा गंडा याद्वारे घालण्यात आलेला आहे. तर, कधी थर्ड पार्टी अॅप डॉउनलोड करायला सांगितले जाते. यात सरतेशेवटी ग्राहकांच्या बँक खात्यातून पैसे गायब झालेले असतात. जोपर्यंत ग्राहकांना याची माहिती होते, तोर्यंत उशिर झालेला असतो. असाच फ्रॉड इतर अॅपच्या माध्यमातूनही करण्यात येत आहे. मात्र, पेटीएमच्या नावाखाली फसवणूक झालेल्या ग्राहकांची संख्या जास्त आहे. या फसवणुकीच्या तक्रारी जास्तकरुन झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यातील ठराविक जिल्ह्यातून जास्त येत असल्याची माहिती, सुमित सोमानी यांनी दिली. झारखंडमधूल जमताडा आणि गिरडीह, बिहारमध्ये धनबाद आणि गया या जिल्ह्यातून तक्रारी आल्या आहेत. तर, पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद, नॉर्थ 24 आणि साउथ 24 विभागातील काही ठिकाणांहून या तक्रारी आल्या आहेत. सायबर सेलच्या विश्लेषणानुसार, सरासरी 10 ते 15 हजारापर्यंत ग्राहकांची फसवणूक झालेली आहे. सोमानी म्हणाले, की दररोज पेटीएमच्या माध्यमातून 5 ते 6 कोटी रुपयांचे व्यवहार होत आहेत. यात 30 ते 40 फसवणुकीच्या तक्रारी येत असतील तर त्या सामान्य आहेत. मात्र, तरीही ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आम्ही या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करत आहे. यासाठी वेगवेगळ्या सुरक्षा पद्धतींचा वापर करण्यावर आम्ही भर देणार असल्याचे सोमानी यांनी सांगितले. पेटीएमचे आवाहन - जर तुम्हाला कोणी कॉल करून सांगतिले की, पेटीएम केवायसी समाप्त झाली आहे. अथवा एसएमएसच्या माध्यमातून ती पुर्ण करा. तर अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका. कोणतेही पेटीएम अथवा पेटीएमचे कर्मचारी अशाप्रकारे कॉल करुन कधीच केवायसी प्रक्रिया पुर्ण करण्यास सांगत नाहीत. थर्ड पार्टी अॅप मोबाईलमध्ये इंस्टॉल करु नका. कंपनीने म्हटले आहे की, ग्राहकांचे केवायसी केवळ त्यांच्या एजेंटद्वारे केले जाते. याशिवाय तुम्ही पेटीएम अॅपवर देखील मिनिमम केवायसी प्रक्रिया पुर्ण करू शकता. त्यामुळे पेटीएमच्या नावाखाली येणाऱ्या कॉलला उत्तर देऊ नका. अन्यथा तुमचे खाते रिकामे होईल. संबंधित बातम्या : Online Fraud बँकेतून बोलतोय सांगत क्रेडिट कार्ड धारकांना लाखोंचा गंडा नाशिकमधील ऑनलाईन फसवणुकीमागे पाकिस्तान कनेक्शन ? कोल्हापूर अर्बन बँकेला ऑनलाईन गंडा, लाखो रुपये 34 खात्यांवर ट्रान्सफर Online Fraud I बँकेतून बोलतोय सांगत क्रेडिट कार्ड धारकांना लाखोंचा गंडा I एबीपी माझा

महत्त्वाच्या बातम्या

AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Instagram Ban In India Fact Check: मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget