एक्स्प्लोर

Online Fraud I बँकेतून बोलतोय सांगत क्रेडिट कार्ड धारकांना लाखोंचा गंडा

पैशांची ऑनलाईन देवाणघेवाण करणाऱ्या मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून फ्रॉड केलेल्या सायबर गुन्ह्यांमध्ये रोज वाढ होत आहे. अशातच नाशिकमधील बँकेच्या तब्बल 32 ग्राहकांच्या खात्यातुन लाखो रुपये गायब झाल्याचं आता समोर आलं आहे.

नाशिक - शहरातील आरबीएल बँकेच्या 32 ग्राहकांना सुमारे 16 लाख रूपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. क्रेडिट कार्ड खरेदी केल्यानंतर कार्ड एक्टिव्हेशनच्या नावाने ग्राहकांना कॉल आले होते. 10 दिवसांत 32 ग्राहकांची अशाप्रकारे फसवणूक करण्यात आली असून तक्रारदारांची संख्या वाढत आहे. सायबर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून बँकेचे सर्व्हर हॅक झाल्याचा संशय ग्राहकांना आहे. सायबर गुन्हे रोखण्याचं मोठं आव्हान पोलीसांसमोर उभं राहिलं आहे. आरबीएल अर्थातच रत्नाकर बँक लिमिटेड. ही बँक नाशिकमध्ये सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरते आहे. ह्याला कारण ठरतंय ते म्हणजे या बँकेच्या 32 ग्राहकांची झालेली ऑनलाईन फसवणूक. नाशिकच्या सायबर पोलिस ठाण्यात या 32 लोकांनी तक्रार दाखल केली असून दिवसेंदिवस हा आकडा वाढत जातोय. या ग्राहकांनी क्रेडिट कार्ड खरेदी केले त्यानंतर बँकेच्या वेबसाईटवर जाऊन पिन रिसेट केला. यानंतर त्यांना आरबीएल बँकेतून बोलत असल्याचा कॉल आला विशेष म्हणजे समोरील महिलेने या ग्राहकांना त्यांचं नाव विशेष म्हणजे कार्ड नंबरही सांगत त्यांच्याकडून जन्मतारीख तसेच बाकी माहिती गोळा केली. काही वेळातच त्यांच्या अकाउंटमधून पैसे गायब झाले. कोणाच्या अकाऊंटमधून 30 हजार तर कोणाच्या दीड लाख. हे एक मोठं रॅकेट असल्याचा संशय ग्राहकांकडून व्यक्त केला जात आहे. बँकेचे लोक डेटा लीक करत असावेत किंवा बँकेचे सर्व्हर हॅक झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. या सर्व प्रकारामुळे बँकेत खळबळ उडालीय. बँकेचे अधिकारी कॅमेरासमोर बोलण्यास तयार नाही. या सर्व घटनेचा आम्ही देखील वरिष्ठ पातळीवर तपास करत असल्याचं त्याच्याकडून सांगण्यात येतंय. तर दुसरीकडे बँकेचे सर्व्हर हॅक झाले असावे किंवा डेटा लीक होत असावा असा संशय ग्राहकांकडून व्यक्त केला जात असून पोलिस देखील या दिशेने तपास करतायत. नाशिकमध्ये खरं तर रोज ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार समोर येताय. कधी ओएलएक्स वरून वस्तू खरेदीच्या नावाखाली पैसे उकळले जातात तर कधी गुगल पे वरुन एखादा व्यवहार करताना अकाउंटमधून पैसे गायब होतात. सायबर गुन्हेगार तसेच हॅकर्स हे कशाप्रकारे हॅक करतात हे आम्ही तज्ञाकडून जाणून घेतलय. दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असताना दुसरीकडे नाशिक पोलीस करतायत काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. गुन्हे करण्यासाठी हॅकर्स वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचं दिसून येत आहे. पोलीसांसमोरही हे गुन्हे रोखण्याच मोठं आवाहन उभं राहिल्याचं बघायला मिळतंय. धक्कादायक म्हणजे महिलांना ऑनलाईन ब्लॅकमेलिंग केलं जात असल्याचंही अनेकवेळा समोर आलय. स्वतःच्या चुकांमुळेच नागरिक हॅकर्सच्या जाळ्यात अडकत असल्याचं पोलीस तपासात समोर येतय. अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक माहिती देणे, ओटीपी शेअर करणे टाळावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येतय. ऑनलाईन व्यवहार करताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं असते. मात्र, नागरिकांकडून ती घेतली जात नाही आणि ते हॅकर्सच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे कुठलाही ऑनलाईन व्यवहार करताना सतर्क राहा आणि काहीतरी चुकीचं घडतंय असा संशय आल्यास तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले आहे. संबंधित बातम्या - नाशिकमधील ऑनलाईन फसवणुकीमागे पाकिस्तान कनेक्शन ? कोल्हापूर अर्बन बँकेला ऑनलाईन गंडा, लाखो रुपये 34 खात्यांवर ट्रान्सफर सोनाक्षी सिन्हाने अॅमेझॉनवर मागवला हेडफोन मिळाला नळाचा तुकडा व्हिडीओ : Online Fraud I बँकेतून बोलतोय सांगत क्रेडिट कार्ड धारकांना लाखोंचा गंडा I एबीपी माझा

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget