एक्स्प्लोर
Advertisement
Whatsappवर 'ही' खोटी लिंक व्हायरल, लिंकवर क्लिक करणं टाळा!
मुंबई: मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर मागील काही दिवसांपासून एक खोटी यूआरएल (URL) लिंक व्हायरल होत आहे. या लिंकमध्ये व्हॉट्सअॅप वेगवेगळ्या रंगात डाऊनलोड करता येईल असा दावा करण्यात आला आहे.
पण ही लिंक खोटी आहे. जेव्हा यूजर्स या लिंकवर क्लिक करतात तेव्हा त्यांच्या स्मार्टफोनवर एक वेबसाईट सुरु होते. ही वेबसाईट व्हॉट्सअॅपची अधिकृत वेबसाईट नाही. ही वेबसाईट सुरु होताच ही लिंक आपोआप तुमच्या फोन कॉन्टॅक्ट लिस्टमधील सर्व यूजर्संना सेंड होते.
तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील यूजर्सला एक मेसेज सेंड होतो. ज्यामध्ये लिहलेलं असतं की, 'आय लव्ह द न्यू कलर ऑफ व्हॉट्सअॅप.' याच मेसेजसोबत खोटी लिंकही दिली जाते. या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर एक अॅडवेअर अॅप डाऊनलोड होत असल्याची तक्रार काही यूजर्सनं केली आहे.
अॅडवेअर अॅप डाऊनलोड झाल्यानंतर अशी माहिती दिली जाते की, व्हॉट्सअॅपचे कलर फक्त व्हॉट्सअॅपच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. यासाठी तुम्हाला ब्लॅकव्हॉट्स नावाचं अॅप डाऊनलोड करावं लागेल.
पण हे फेक अॅप गुगलनं प्ले स्टोअरवर बॅन केलं आहे. जर तुम्हालाही असा मेसेज आला तर सावधान राहा. कारण की, व्हॉट्सअॅपनं आतापर्यंत मल्टी कलर सेवा सुरु केलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement