एक्स्प्लोर
व्हायरल सत्य : फेसबुक प्रायव्हसी नोटीसमधील तथ्य
मुंबई : फेसबुकवरील पोस्ट्स सार्वजनिक होणार असल्याचा एक मेसेज सध्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला आहे. तुम्ही 'ठराविक' मेसेज फेसबुकवर पोस्ट न केल्यास तुमच्या सर्व पोस्ट, फोटो, व्हिडिओ पब्लिक होतील, अशी भीती या मेसेजमध्ये दाखवली जात आहे. मात्र यात काडीमात्र तथ्य नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
फेसबुककडूनच हा मेसेज म्हणजे एक होअॅक्स अर्थात अफवा असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. जो मेसेज व्हायरल होत आहे, तो कॉपी करुन फेसबुकवर पोस्ट करण्याचं आवाहन या बनावट मेसेजमध्ये करण्यात येतं. कायद्याचा दाखला दिल्याने अनेक जण याला बळी पडतात आणि मित्रांनाही ही 'व्हायरल लागण' करण्यास भाग पाडतात.
फेसबुकवर अशाप्रकारचे मेसेज पसरण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. जुन्या जाणत्या फेसबुकवासियांना आता अशा व्हायरल अफवांची सवय झाली आहे. थोड्या थोड्या दिवसांनी हे मेसेज डोकं वर काढत असतात. मात्र नव्या यूझर्सना ही भीती ठरत आहे.
मेसेजमध्ये ज्या UCC चा उल्लेख आहे, ते अमेरिकेतील एक कमर्शिअल लॉ कोर्ट आहे. सोशल नेटवर्किंग साईटवरील प्रायव्हसी सेटिंग्सशी त्याचा काहीही संबंध नाही. तुमच्या पोस्टमध्ये उजव्या हाताला असलेल्या बटणावर तुम्ही प्रायव्हसी ठरवू शकता. कुठलीही पोस्ट कॉपी-पेस्ट केल्याने पोस्ट सार्वजनिक करणं किंवा न करणं ठरत नाही. त्यामुळे यूझर्सनी कुठल्याही भूलथापांना बळी न पडता, अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन फेसबुकतर्फे करण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement