एक्स्प्लोर
मोबाईल कनेक्शनसाठी आता ई-केवायसी बंधनकारक
मुंबई : नवीन मोबाईल कनेक्शन घेण्यासाठी आता आधारकार्ड सक्तीचं होणार आहे. आयकर विवरण भरण्यासाठी आणि पॅनकार्डसाठी केंद्र सरकारकडून नुकतंच आधार सक्तीचं करण्यात आलं आहे. आता ई-केवायसीच्या माध्यमातून ग्राहकाची पडताळणी होईल, त्यानंतरच नवीन मोबाईल कनेक्शन घेता येईल.
दूरसंचार विभागानं या जारी केलेल्या नव्या नियमावलीत ई-केवायसीची सक्ती करण्यात आली आहे. फक्त नवीन कनेक्शन घेतानाच नाही, तर जुन्या मोबाईल कनेक्शनधारकांनाही ई-केवायसीच्या माध्यमातून आपला नंबर व्हेरिफाय करावा लागणार आहे.
प्रीपेड आणि पोस्टपेड सर्वच मोबाईल कनेक्शन धारकांना ई-केवायसी करावी लागणार आहे. त्यासाठी सर्व मोबाईल कंपन्यांना 6 फेब्रुवारी 2018 ची मुदत देण्यात आली आहे. या तारखेपर्यंत जर व्हेरिफिकेशन करता आलं नाही, तर मोबाईल कनेक्शन बंद केलं जाईल.
नुकतंच सुप्रीम कोर्टानं भारतातील सर्व मोबाईल क्रमांक व्हेरिफाय करण्याचे निर्देश दिले होते. तसंच या नव्या ई-केवायसी प्रक्रियेची माहिती लवकरात लवकर सर्व ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासही मोबाईल कंपन्यांना सांगितलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement