(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लॉकडाऊनमध्ये घरी राहून कंटाळालेल्या युजर्ससाठी गुगलचं खास Doodle
लॉकडाऊनमध्ये युजर्सचा कंटाळा घालवण्यासाठी Google आपल्या जुन्या Doodle सीरीज पुन्हा युजर्ससाठी घेऊन आलं आहे.
नवी दिल्ली : Google आपल्या जुन्या Doodle सीरीज युजर्ससाठी पुन्हा घेऊन आलं आहे. लॉकडाऊनमध्ये लोकांना घरी कंटाळा येऊ नये म्हणून गुगलने आपल्या डुडलमध्ये कोडिंग गेम दिला आहे. गुगलच्या या डुडल सीरिजमध्ये अनेक लोकप्रिय गेम्स देण्यात आले आहेत.
आज गुगलच्या डुडलमध्ये एक गमतीशीर कोडिंग गेम असून त्यामध्ये एक ससा आहे. हा ससा गाजर एकत्र करत आहे. हा गेम सोपा आहे. या गेममध्ये प्लेयर म्हणजेच, गेम खेळणारे युजर्स सशाला कंट्रोल करू शकतात. हा गेम नॉन प्रोग्रामर्सही खेळू शकतात.
गुगल किड्स कोडिंगला 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 2017मध्ये सर्वात आधी कोडिंग लॉन्च करण्यात आलं होतं. तेच आता लॉकडाऊनमध्ये युजर्सच्या मनोरंजनासाठी पुन्हा एकदा घेऊन आलं आहे. जर लॉकडाऊनमध्ये तुम्ही घरीच असाल आणि कंटाळा आला असेल तर हा गेम नक्की ट्राय करू शकता.
पाहा व्हिडीओ : भारतात 21 मे पर्यंत कोरोनाचा प्रभाव कमी होईल : एसयूटीडी
गुगल डुडलने या गेमला डुडल टीम, गुगल ब्लॉकली टीम आणि MIT स्क्रॅट टीम यांनी एकत्र येऊन तयार केला आहे. हा गेम तुम्हाला आलेला कंटाळा घालवण्यासाठी नक्की मदत करेल. याचबरोबर तुम्ही अनेक गोष्टी शिकूही शकता.
दरम्यान, गुगल आपल्या डुडलमार्फत युजर्ससाठी अनेक नवनव्या गोष्टी घेऊन येत असतं. गुगलने कोरोना व्हायरसबाबत खास डुडल्सची सीरिज केली आहे. याआधी गुगलने शिक्षक, फऊड सर्विस देणारे कर्मचारी, लोकांपर्यंत आवश्यक सेवा पोहोचवणारे पॅकेजिंग, शिपिंग आणि डिलीवरी वर्कर्सना धन्यवाद दिलं होतं. याव्यतिरिक्त कोरोना व्हायरसशी दोन हात करणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सेसचे आभार मानण्यासाठी वेगवेगळे डुडल तयार केले होते. त्याचबरोबर एका डुडलमार्फत जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी आवश्यक टीप्सही दिल्या होत्या.
संबंधित बातम्या :
Zoom व्हिडीओ कॉलिंगला टक्कर देण्यासाठी Facebook ने लॉन्च केली नवी सर्विस
Coronavirus | अफवांवर लागणार लगाम! फेसबुक लॉन्च करणार खास फिचर
YouTube ने भारतीय युजर्ससाठी लॉन्च केलं UPI पेमेंट फिचर