एक्स्प्लोर

गुगलपेक्षा अचूक उत्तर देणारं ChatGPT, जाणून घ्या जगात चर्चा असणारं हे चॅटबॉट काय आहे

OpenAI: या ॲपमुळे मनुष्याची विचार करण्याची क्षमता कमी होत जाणार नाही का? माझी नोकरी जाणार का? लाखो लोक एका झटक्यात बेकार होतील का? यासारखे प्रश्न उपस्थित होत आहेत. 

मुंबई: OpenAI या AI कंपनीने ChatGPT, कंपनीच्या नवीन GPT-3.5 नैसर्गिक भाषा निर्मिती तंत्रज्ञानावर आधारित चॅटबॉटची घोषणा केली आणि ते 30 नोव्हेंबरला रिलीज केलं. GPT म्हणजे Generative Pre-trained Transformer.  आठवड्याभरात 1 मिलियनहून अधिक युजर्स असणाऱ्या चॅटजीपीटी या प्रणालीत आपल्याला संवादात्मक पद्धतीने इंटरनेटवरील माहिती मिळवणे सोपे होणार.

ट्विटरचे सीईओ ईलॉन मस्क आणि ओपन एआयचे सीईओ सॅम अल्टमॅन यांनी एकत्र या कंपनीची स्थापना केली होती. काही अंशी मायक्रोसॉफ्टचीसुद्धा यात गुंतवणूक आहे. ओपनएआयने (OpenAI) ने यापूर्वी DALL-E (डॅल-ई) सादर केले होते, हे एक AI इमेज जनरेटर आहे जो तुम्हाला पाहिजे तशी इमेज तयार करून देतो.

चॅटजीपीटी ही अगदी गूगलची सुधारित आवृत्ती असल्याचेही अनेकांनी म्हटले आहे. पण हे गुगलच्या पुढे जाऊन इंटरनेटवर उपलब्ध असलेला मजकूर आणि साहित्य वाचून आणि मुख्य म्हणजे तो मजकूर समजून घेऊन तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतं, तेही अगदी एखाद्या विचारवंतासारखं. 

चॅटजीपीटीचा सर्वात उत्तम फायदा म्हणजे तुम्ही आधीच्या प्रश्नाच्या उत्तरावरसुद्धा आधारित प्रश्न करू शकता. हे बॉट तुम्ही भूतकाळात विचारलेले प्रश्न लक्षात ठेवतं आणि जर तुम्ही एखादी त्याने एखादी केलेली चूक दाखवली तर त्यामध्ये स्वतः सुधार करतं. माणूस कल्पनेच्या जोरावर ज्या क्रिएटिव्ह गोष्टी करतो तेसुद्धा हा बॉट करतो. 

डीप लर्निंग ही एक मशीन लर्निंग पद्धत आहे ज्यामध्ये न्यूरल नेटवर्कचे तीन किंवा अधिक स्तर असतात. हे नेटवर्क मानवी मेंदूप्रमाणे विचार करण्याचा प्रयत्न करतं आणि डेटा वापरून आपल्याप्रमाणे शिकतं. अशावेळी चॅटजीपीटी हे एखाद्या शिक्षकाप्रमाणे तुमचा प्रश्न समजून केवळ माहितीच नव्हे तर उदाहरणासह उत्तर देऊ शकते. 

तुम्हाला इंटरेटवरील हजारो लेख वाचून त्यातून हवं असणारं अचूक उत्तर ही प्रणाली देऊ शकते. चॅट जीपीटी ही माहिती निर्माण करण्यास सक्षम आहे. हे उत्तर पॅराग्राफ, लेख, कविता, कथा कोणत्याही स्वरूपात असू शकतं. सर्व तंत्रज्ञानाप्रमाणेच चॅटजीपीटीलासुद्धा मर्यादा आहेत. ChatGPT विस्तृत आणि नेमकी माहिती देऊ शकत असले तरीही या माहितीची सत्यता 100 टक्के योग्य असेल याची खात्री नाही.

ChatGPTचा वापर शिक्षण, कला,कायदा वगैरे क्षेत्रात तर होऊच शकतो, पण त्याचबरोबर कोडिंगच्या आणि मीडिया क्षेत्रात याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.OpenAI हे अजून बिटा मोडवर आहे त्यामुळे येणाऱ्या काळात यात मोठे बदल अपेक्षित आहेत. 

या ॲपमुळे मनुष्याची विचार करण्याची क्षमता कमी होत जाणार नाही का? माझी नोकरी जाणार का? लाखो लोक एका झटक्यात बेकार होतील का? यंत्र आता पटकथा आणि कविता लिहू लागल्यावर लेखक-कवींच्या पोटावर पाय येऊ शकतो? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्तानं इंटरनेटवर उपस्थित होत आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
Vinod Tawde : मोदींना मत दिलं तर लोकांना काय मिळालं? भाजपचे विनोद तावडे स्पष्टच बोलले
मोदींना मत दिलं तर लोकांना काय मिळालं? भाजपचे विनोद तावडे स्पष्टच बोलले
Bachchu Kadu : बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची, वादावादीत कोण-काय म्हणालं? वाचा सविस्तर...
बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची, वादावादीत कोण-काय म्हणालं? वाचा सविस्तर...
Shah Rukh Khan with Suhana Khan : शाहरुख खान पुन्हा 'डॉन'च्या भूमिकेत, लेक सुहानासोबत करणार दोन हात; लेकीच्या करिअरसाठी किंग खान सरसावला
शाहरुख खान पुन्हा 'डॉन'च्या भूमिकेत, लेक सुहानासोबत करणार दोन हात; लेकीच्या करिअरसाठी किंग खान सरसावला
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amravati Amit Shaha Stage Collapsed : ज्या मैदानासाठी बच्चू कडूंनी राडा घातला तिथला मंडपच कोसळला!Aditya Thackeray Full Pc: ज्यांनी दिली साथ त्यांचाच केला भाजपने घात, आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोलAmit Shaha Rally Akola : अकोल्यात आज केंद्रीय मंत्री अमित शाहांची सभा, जोरदार पावसाची हजेरीSanjay Raut on Devendra Fadnavis : स्वत:ची अटक टाळण्यासाठी फडणवीसांनी पक्ष फोडले, राऊतांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
Vinod Tawde : मोदींना मत दिलं तर लोकांना काय मिळालं? भाजपचे विनोद तावडे स्पष्टच बोलले
मोदींना मत दिलं तर लोकांना काय मिळालं? भाजपचे विनोद तावडे स्पष्टच बोलले
Bachchu Kadu : बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची, वादावादीत कोण-काय म्हणालं? वाचा सविस्तर...
बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची, वादावादीत कोण-काय म्हणालं? वाचा सविस्तर...
Shah Rukh Khan with Suhana Khan : शाहरुख खान पुन्हा 'डॉन'च्या भूमिकेत, लेक सुहानासोबत करणार दोन हात; लेकीच्या करिअरसाठी किंग खान सरसावला
शाहरुख खान पुन्हा 'डॉन'च्या भूमिकेत, लेक सुहानासोबत करणार दोन हात; लेकीच्या करिअरसाठी किंग खान सरसावला
Bachchu Kadu Amravati : पोलिसांच्या पाया पडले, एकाला फटकावलं; बच्चू कडूंचा A टू Z राडा
पोलिसांच्या पाया पडले, एकाला फटकावलं; बच्चू कडूंचा A टू Z राडा
Bollywood Intimate Scenes : बॉलिवूडच्या 'या' चित्रपटांत इंटिमेट सीन्सदरम्यान बोल्डनेसच्या सर्व सीमा पार; शूटिंगदरम्यानच कलाकार झाले 'Out Of Control'
बॉलिवूडच्या 'या' चित्रपटांत इंटिमेट सीन्सदरम्यान बोल्डनेसच्या सर्व सीमा पार; शूटिंगदरम्यानच कलाकार झाले 'Out Of Control'
Bacchu Kadu Vs Navneet Rana : अमरावतीत सभास्थळावरून राणा-कडू वाद चिघळला, बच्चू कडूंनी थेट मैदानातच ठाण मांडलं; नेमकं प्रकरण काय?
अमरावतीत सभास्थळावरून राणा-कडू वाद चिघळला, बच्चू कडूंनी थेट मैदानातच ठाण मांडलं; नेमकं प्रकरण काय ?
Bachchu Kadu Amravati : अमरावतीत राडा, बच्चू कडू यांनी कुणाला मारलं? ABP Majha
Bachchu Kadu Amravati : अमरावतीत राडा, बच्चू कडू यांनी कुणाला मारलं? ABP Majha
Embed widget