एक्स्प्लोर
स्वातंत्र्य दिनानिमित्त बीएसएनएलची बंपर ऑफर

मुंबई: स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर बीएसएनएनएलनं आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर देऊ केली आहे. उद्या तुम्ही लँडलाईनवरून कोणत्याही कंपनीच्या मोबाईलवर कॉल केला, तर त्यासाठी तुम्हाला कोणतंही बिल आकारलं जाणार नाही आहे. उद्या 15 ऑगस्ट रोजी कोणत्याही मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या क्रमाकांवर तुम्ही तुमच्या लँडलाईनमार्फत हवं तितकं वेळ अगदी मोफत बोलू शकणार आहात. विशेष म्हणजे, ही ऑफर केवळ उद्यापुरतीच नाही, तर यापुढच्या प्रत्येक रविवारी लागू असणार आहे. केंद्रीय दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांनी ही माहिती दिली. बीएसएनएल ही भारतातली एक अग्रणी सेवा आहे. त्यामुळे या योजनेचा अनेकांना फायदा होणार आहे.
आणखी वाचा























