एक्स्प्लोर

इलॉन पर्वाला सुरुवात, मस्क यांनी ट्विटरचा पदभार स्वीकाल्यानंतर असा आहे संपूर्ण घटनाक्रम

Elon Musk The owner of Twitter: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क ट्विटर मायक्रोब्लॉगिंग साइटचे प्रमुख बनले आहेत.

Elon Musk The owner of Twitter: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क ट्विटर मायक्रोब्लॉगिंग साइटचे प्रमुख बनले आहेत. मस्क यांनी ट्विटरचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यापासून केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर वापरकर्त्यांसाठीही बरेच काही बदलू शकते, असे संकेत मागच्या काही दिवसांत वेळोवेळी त्यांनी ट्वीट करून दिले आहेत. कंपनीत मोठे बदल पाहायला मिळतील, असं बोललं जात आहे. 

ट्विटर बायो मध्ये "चीफ ट्वीट" असा उल्लेख!

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी गेल्या आठवड्यात 44 अब्ज देऊन ट्विटर अधिग्रहण करार केला आणि मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचा ताबा घेतला. मस्क या आठवड्याच्या सुरुवातीला एक सिंक घेऊन ट्विटरच्या मुख्यालयात पोहोचले. Entering Twitter HQ – let that sink in! हे वाक्य लिहित त्यांनी हा व्हिडीओ त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. त्यानंतर काही वेळातच त्यांनी ट्विटरमधील अधिकाऱ्यांशी कॉफी पीत गप्पा मारतानाचा फोटो शेअर केला. त्याच दिवशी त्याणी त्यांचे ट्विटर बायो मध्ये "चीफ ट्विट" असा उल्लेख करत स्वतःचे ट्विटर update केले.

कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येईल, हे वृत्त चुकीचे

अधिग्रहणानंतर मस्कने ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेहगल आणि कायदेशीर व्यवहार आणि धोरण प्रमुख विजया गड्डे यांना गुरुवारी काढून टाकले होते. याच पार्श्वभूमीवर 1 नोव्हेंबरपूर्वी ट्विटरमध्ये कर्मचाऱ्यांची कपात केली जाऊ शकते, अशा बातम्या समोर येत होत्या. एका व्यक्तीने ट्विटरवर इलॉन मस्क यांना कर्मचारी कपातीबद्दल प्रश्न विचारला. यावर प्रतिक्रिया देताना, हे वृत्त चुकीचे असल्याचे इलॉन मस्क यांनी म्हटले आहे.

इलॉन मस्क हे सध्या कंपनीचे एकमेव संचालक!

इलॉन मस्क यांनी ट्विटरचे प्रमुख म्हणून पद स्वीकारल्यानंतर काही तासातच ट्विटरचे जुने संपूर्ण कंपानीचे बोर्ड काढून टाकले आहे आणि आता इलॉन मस्क हे सध्या कंपनीचे एकमेव संचालक आहेत, असे कंपनीने सोमवारी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनकडे कळवलं आहे. मस्क यांनी नंतर ट्विटरवर सांगितले की, हा नवीन कंपनीचा बोर्ड सेटअप "तात्पुरता" आहे, परंतु आता कंपनीच्या नवीन बोर्डात कोण असेल यासंदर्भातले कोणतेही तपशील देण्यात आलेले नाही.

ब्लू टिक टिकवून ठेवण्यासाठी पैसे द्यावे लागणार का?

ट्विटरचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक पाऊल उचलले जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याचा थेट फटका वापरकर्त्याला (युजर्स) बसणार आहेत. रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, ट्विटर वापरकर्त्याला युजर्सचं खातं व्हेरिफाइड करण्यासाठी आणि ब्लू टिक देण्यासाठी शुल्क आकारण्याचा विचार करत आहे. ट्विटर वापरकर्त्यांना ब्लू टिक टिकवून ठेवण्यासाठी म्हणजेच, त्यांचं अकाउंट व्हेरिफाईड करण्यासाठी 4.99 डॉलर्स म्हणजेच, सुमारे 415 रुपये प्रति महिना भरावे लागण्याची शक्यता आहे. मात्र  ट्विटरने याला अद्याप कुठलाही दुजोरा दिलेला नाही.

NFT च काय होणार ?

Twitter ने नॉन-फंजिबल टोकन (NFT) ट्वीट टाइल्स लॉन्च केले आहे. विकसकांच्या म्हणण्यानुसार निर्माते आणि ग्राहक थेट ट्विटरद्वारे एनएफटी खरेदी, विक्री आणि देवाणघेवाण करू शकतील, ज्यामध्ये मध्यस्थाची गरज नाही.  जानेवारी महिन्यामध्ये मस्कने NFT वर टीका केली की, "हे त्रासदायक आहे" अशा आशयाचं ट्वीट इलॉन मस्कने केलं होतं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार

व्हिडीओ

Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Bajrang Sonawane : दोन गोष्टी पक्क्या, वाल्मिक कराडला जामीन अन् धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही, बजरंग सोनवणेंचा टोला
धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या मंत्रिमंडळात दिसणार नाहीत, त्यांनी मंत्रिपदासाठी अमेरिकेला जावं : बजरंग सोनवणे
Ajit Pawar: अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
Embed widget