एक्स्प्लोर

Apple Watch OS9 : अॅपल वॉचचा चेहरा-मोहरा बदलणार, नवा OS9 लॉन्च

Apple WWDC 2022 : अॅपलच्या वार्षिक वर्ल्डवाइड डेवलपर्स कॉन्फ्रेंस (WWDC) इव्हेंटमध्ये अॅपलनं काही नवे अपडेटही समोर आणले.

Apple WWDC 2022 : जगातील टॉप मोबाईल ब्रँड असणाऱ्या Apple चे सर्वच प्रोडक्टस अव्वल दर्जाचे असतात. दरवर्षी नवनवीन टेक्नोलॉजी अॅपल कंपनी बाजारात आणत असते. यंदाही अॅपलने त्यांच्या वार्षिक वर्ल्डवाइड डेवलपर्स कॉन्फ्रेंस (WWDC) इव्हेंटमध्ये काही खास प्रोडक्ट्स लॉन्च करत नवनवे अपडेटही समोर आणले.  यादरम्यान अॅपलनं अॅपल वॉच युजर्ससाठी नवं अपडेट समोर आणलं आहे. आता अॅपल वॉचमध्ये ओएस 9 (OS9) वापरण्यात येणार असून यामुळे वॉचचा वापरात कमालीचा बदल होणार असून वापरकर्त्यांना अधिक सोयीस्कर होणार आहे.

अॅपल वॉचच्या नव्या OS9 नुसार आता वॉचमध्ये सिरीचं नवीन इंटरफेअरन्स पाहता येणार आहे. याशिवाय आधीपेक्षा अधिक वर्कआऊट मोड्स आता अॅपल वॉचमध्ये पाहायला मिळणार आहे. तसंच विशेष मेडिकेशन अॅपदेखील आता वॉचमध्ये असणार असून याशिवाय वॉचमध्ये अधिक फेसेस वापरकर्त्यांना पाहायला मिळणार आहेत.   

नवकोरं मॅकबुकही लॉन्च 

यासोबतच या इव्हेंटमध्ये Apple ने आपला नवीन MacBook देखील लॉन्च केला आहे. ज्यामध्ये कंपनीकडून ग्राहकांसाठी अनेक फिचर्सची मेजवाणी देण्यात आली आहे. नव्या MacBook मध्ये कंपनीकडून M2 प्रोसेसर देण्यात आला आहे. Apple नं दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा 5nm डिझाइन केलेला M2 प्रोसेसर 25 अब्ज ट्रान्झिस्टरसह Apple च्या सिलिकॉनची नेक्सट जेनरेशन आहे. असं सांगितलं जात आहे की, M2 प्रोसेसर 10-कोर GPU आहे आणि तो 8-कोर CPU वर काम करतो. हा प्रोसेसर 24GB ची युनिफाइड (Unified) मेमरी हाताळू शकतो. 

Apple च्या माहितीनुसार, नवीन MacBook Air आणि 13-inch MacBook Pro पुढील महिन्यात निवडक Apple अधिकृत किरकोळ विक्रेत्यांकडे उपलब्ध होईल. मात्र, कंपनीकडून कोणतीही निश्चित तारीख देण्यात आलेली नाही. M2 चिपसेटसह Apple च्या MacBook Air ची किंमत 1,19,900 रुपये आणि शिक्षणासाठी 1,09,900 रुपये आहे. M2 सह 13-इंचाचा MacBook Pro 1,29,900 रुपये आणि शिक्षणासाठी 1,19,900 रुपयांपासून सुरू होतो. 35W ड्युअल USB-C पोर्ट पॉवर अॅडॉप्टर 5,800 रुपयांना उपलब्ध असेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 

यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole on Raj Thackeray | महापालिका निवडणुकांसाठी 'राज'कीय समीकरण ठरतंय?Rajkiya Shole on Raj Thackeray | मनपा निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्रित नाष्टा करणार का?Zero Hour Full | देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट? कारण काय? ABP MajhaBeed Sarpanch Death : संतोष देशमुख हत्येदिवशीचा CCTV;  स्कॉर्पियो सोडून सहा आरोपी पळाले!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
Nashik Crime : गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
Embed widget