एक्स्प्लोर

Apple Security Breach : ॲपल युजर्स सावधान! आयफोन आणि मॅक हॅकर्सच्या निशाण्यावर, होतेय डेटा चोरी

Apple Security Breach : ॲपल युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ॲपल आयफोन आणि मॅक हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. सॉफ्टवेअरमधील या त्रुटीमुळे हॅकर्सने आयफोन आणि मॅकला लक्ष्य केलं आहे.

Apple Security Breach : ॲपल (Apple) युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आयफोन (iPhone) आणि मॅक (Mac) हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. ॲपल कंपनीनं युजर्सना याबाबत सावध केलं आहे. ॲपल कंपनीला एका त्रुटीबद्दल माहिती मिळाली आहे. सॉफ्टवेअरमधील या त्रुटीमुळे हॅकर्सने आयफोन आणि मॅकला लक्ष्य केलं आहे. या होलचा वापर करुन हॅकर्स iPhones, iPads आणि Mac वर नियंत्रण मिळवता येतं, असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ॲपल कंपनीने युजर्सला सावध राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच कंपनीनं युजर्सला डिव्हाईस अपडेट करण्याचं आवाहन केलं आहे.

हॅकर्स युजर्सच्या डिव्हाईसवर नियंत्रण मिळवू शकतात

टेक टायटनच्या माहितीनुसार, ॲपल डिव्हाईसमधील त्रुटीबद्दल हॅकर्सला माहिती असून हॅकर्स याचा फायदा घेत आहेत. ॲपल कंपनीला याबाबत माहिती मिळाली असून कंपनीने ॲपल युजर्सला सावध केलं आहे. दरम्यान, हॅकर्सने आतापर्यंत किती डेटा चोरी केला आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हॅकर्स या लूप होलचा वापर करुन युजर्सच्या डिव्हाईसवर नियंत्रण मिळवू शकतात. त्यामुळे युजर्सचा डेटा चोरी होण्याचा आणि सायबर हल्ल्याचा धोका आहे. 

कोणते डिव्हाईस हॅकर्सच्या निशाण्यावर?

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ॲपल युजर्सने त्यांचे डिव्हाईस अपडेट करावेत. हॅकर्स त्रुटीचा वापर करुन युजरच्या मोबाईल किंवा लॅफटॉपवर नियंत्रण मिळवू शकतात. यामध्ये आयफोन 6 (iphone 6S) नंतरचे मॉडेल आयपॅड 5 (ipad 5) नंतरचे मॉडेल, आयपॅड प्रो (iPad Pro), आयपॅड एअर (iPad Air) आणि मॅकबूक (MacBook) चा समावेश आहे. दरम्यान, ॲपल कंपनीने या त्रुटी कोणी, कशा आणि कधी शोधल्या याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

Apple Watch युजर्सना सतर्कतेचा इशारा

Apple Watch सुरक्षित मानलं जातं, परंतु या आधीच भारत सरकारने pple Watch युजर्सना सतर्कतेचा इशारा दिला आहे. Apple Watch द्वारे सायबर हल्ल्याचा धोका समोर आला आहे. भारत सरकारने watchOS 8.7 च्या आधीच्या सर्व OS आवृत्त्यांवर चालणारे Apple Watch युजर्ससाठी धोकादायक असल्याचे सांगितले आहे. जुन्या OS चे स्मार्टवॉच वापरणाऱ्यांना सायबर हल्ल्याचा धोका असल्याचे केंद्र सरकारनं म्हटलं आहे. 

युजर्सना सतर्कतेचा इशारा

भारत सरकार म्हणते की watchOS 8.7 पेक्षा जुन्या सर्व OS असलेल्या Apple Watch चे युजर्सना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ॲपल वॉचमध्ये आढळणाऱ्या असुरक्षिततेचा फायदा कोणताही सायबर गुन्हेगार घेऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार, ॲपलने त्याच्या सपोर्ट पेजवर जुन्या व्हर्जनवर चालणाऱ्या घड्याळाबाबत पुष्टी केली आहे, त्यानंतर भारत सरकारने याबाबत एक अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे.

CERT-in ची धोक्याबाबत सविस्तर माहिती

भारत सरकारच्या सूचनेनुसार, जुन्या व्हर्जनवर ॲपल वॉचच्या युजर्सनी नवीन आवृत्ती म्हणजेच watchOS 8.7 वर अपडेट केले पाहिजे. यासोबतच इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-in) ने या धोक्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. 8.7 पेक्षा जुन्या सर्व OS ला धोक्याचे रेटिंग मिळाले आहे, ज्यामुळे सरकारला एक ॲडव्हायझरी जारी करावी लागली आहे.

तुमचे OS अपडेट करा

ॲपलनेही आपल्या वॉचचा हा धोका स्वीकारला आहे. हा धोका टाळण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे तुमचे Apple Watch ताबडतोब OS 8.7 वर अपडेट करणे, कारण कंपनीने त्यात सर्व सुरक्षा फिचर्स आणली आहेत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrakant Patil: अजितदादांनी पुण्यात भाजपची पिसे काढताच चंद्रकांतदादांचा तीळपापड; मतदान करताच दिला सूचक इशारा, म्हणाले, 'अजित पवार ज्या पद्धतीने बोलतायत ते पाहता..'
अजितदादांनी पुण्यात भाजपची पिसे काढताच चंद्रकांतदादांचा तीळपापड; मतदान करताच दिला सूचक इशारा, म्हणाले, 'अजित पवार ज्या पद्धतीने बोलतायत ते पाहता..'
Tejasvee Ghosalkar BMC Election 2026: मतदानाला जाताना नवऱ्याचा फोटो बघून तेजस्वी घोसाळकरांना रडू फुटलं, म्हणाल्या, 'आज अभिषेकची खूप आठवण येतेय'
मतदानाला जाताना नवऱ्याचा फोटो बघून तेजस्वी घोसाळकरांना रडू फुटलं, म्हणाल्या, 'आज अभिषेकची खूप आठवण येतेय'
Maharashtra Municipal Election: निवडणूक आयोगाच्या दळभद्री कारभाराचा कहर; सकाळीच मतदानासाठी आलेल्यांची नावे सापडेनात, ईव्हीएमची बटन दाबेनात, काही ठिकाणी सुरु होण्यापूर्वीच बंद सुद्धा पडली
निवडणूक आयोगाच्या दळभद्री कारभाराचा कहर; सकाळीच मतदानासाठी आलेल्यांची नावे सापडेनात, ईव्हीएमची बटन दाबेनात, काही ठिकाणी सुरु होण्यापूर्वीच बंद सुद्धा पडली
Nashik Municipal Election 2026: मतदानाच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये EVM मध्ये बिघाड; प्रशासनाची धावपळ, नागरिकांचा संताप
मतदानाच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये EVM मध्ये बिघाड; प्रशासनाची धावपळ, नागरिकांचा संताप

व्हिडीओ

Murlidhar Mohol : पुणेकरांचं पूर्ण समर्थन सोबत राहिल असा मुरलीधर मोहोळ यांना विश्वास
Makar Sankranti Politics : संपला प्रचार कडवा, आता तीळगुळाचा गोडवा Special Report
Ajit Pawar Irrigation Scam : सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची दादांकडून परतफेड Special Report
Raj Thackeray PADU Machine : निवडणुकीत आलं 'पाडू''इंजिन'लागलं धडधडू Special Report
Solapur Mahapalika Election : भाजप उमेदवाराच्या मुलाकडून पैसे वाटप? धक्कादायक व्हिडीओ समोर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrakant Patil: अजितदादांनी पुण्यात भाजपची पिसे काढताच चंद्रकांतदादांचा तीळपापड; मतदान करताच दिला सूचक इशारा, म्हणाले, 'अजित पवार ज्या पद्धतीने बोलतायत ते पाहता..'
अजितदादांनी पुण्यात भाजपची पिसे काढताच चंद्रकांतदादांचा तीळपापड; मतदान करताच दिला सूचक इशारा, म्हणाले, 'अजित पवार ज्या पद्धतीने बोलतायत ते पाहता..'
Tejasvee Ghosalkar BMC Election 2026: मतदानाला जाताना नवऱ्याचा फोटो बघून तेजस्वी घोसाळकरांना रडू फुटलं, म्हणाल्या, 'आज अभिषेकची खूप आठवण येतेय'
मतदानाला जाताना नवऱ्याचा फोटो बघून तेजस्वी घोसाळकरांना रडू फुटलं, म्हणाल्या, 'आज अभिषेकची खूप आठवण येतेय'
Maharashtra Municipal Election: निवडणूक आयोगाच्या दळभद्री कारभाराचा कहर; सकाळीच मतदानासाठी आलेल्यांची नावे सापडेनात, ईव्हीएमची बटन दाबेनात, काही ठिकाणी सुरु होण्यापूर्वीच बंद सुद्धा पडली
निवडणूक आयोगाच्या दळभद्री कारभाराचा कहर; सकाळीच मतदानासाठी आलेल्यांची नावे सापडेनात, ईव्हीएमची बटन दाबेनात, काही ठिकाणी सुरु होण्यापूर्वीच बंद सुद्धा पडली
Nashik Municipal Election 2026: मतदानाच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये EVM मध्ये बिघाड; प्रशासनाची धावपळ, नागरिकांचा संताप
मतदानाच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये EVM मध्ये बिघाड; प्रशासनाची धावपळ, नागरिकांचा संताप
BMC Election 2026 Dubar Voter In Mumbai: मुंबईत पहिला दुबार मतदार सापडला; मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदारांसमोर काय घडलं?
मुंबईत पहिला दुबार मतदार सापडला; मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदारांसमोर काय घडलं?
BMC Election 2026: मुंबईतील रात्री 12.30 वाजता शिंदे गटाच्या आमदाराचा मुलगा मतदान केंद्रात शिरला, ठाकरे गट आक्रमक, वॉर्ड क्रमांक 153 मध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईतील रात्री 12.30 वाजता शिंदे गटाच्या आमदाराचा मुलगा मतदान केंद्रात शिरला, ठाकरे गट आक्रमक, वॉर्ड क्रमांक 153 मध्ये नेमकं काय घडलं?
BMC Election 2026 Election Commission: आधी PADU मशीन अन् शेवटच्या क्षणी निवडणूक आयोगाचा आणखी एक धक्कादायक निर्णय, मतदान केंद्राच्या आत...
आधी PADU मशीन अन् शेवटच्या क्षणी निवडणूक आयोगाचा आणखी एक धक्कादायक निर्णय, मतदान केंद्राच्या आत...
Maharashtra Municipal Election 2026: राज्यातील 29 महापालिकांसाठी आज मतदान; फडणवीस, ठाकरे बंधूंसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
राज्यातील 29 महापालिकांसाठी आज मतदान; फडणवीस, ठाकरे बंधूंसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Embed widget