एक्स्प्लोर

अॅपलच्या स्पेशल इव्हेंटमध्ये iPhone 11 सह 'iOS 13' होणार लॉंच, 'मॅकबुक, वॉच सिरीज 5'चीही घोषणा होण्याची शक्यता

स्टिव्ह जॉब्स थिएटरमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात मोबाईल्ससोबतच आयओएस 13, वॉच ओएस 6, मॅकबुक ओएस कॅटालिना आणि टी. व्ही. ओएस 13 ही अॅपल डिव्हायसेसुद्धा रिव्हील केली जाणार आहेत.

मुंबई: जगभरातील अॅपल लव्हर्ससाठी आज खास दिवस आहे, कारण अॅपल iPhone 11 च्या लॉंचचं काऊंटडाऊन आता सुरु झालेलं आहे. आज रात्री 10:30 वाजता अॅपलच्या सॅन जोसयेथील हेड ऑफिसमध्ये एक स्पेशल इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे.  या विशेष कार्यक्रमात अॅपलतर्फे आयफोनची एक नवी जनरेशन लॉंच करण्यात येणार आहे. स्टिव्ह जॉब्स थिएटरमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात मोबाईल्ससोबतच आयओएस 13, वॉच ओएस 6, मॅकबुक ओएस कॅटालिना आणि टी. व्ही. ओएस 13 ही अॅपल डिव्हायसेसुद्धा रिव्हील केली जाणार आहेत.

अॅपलने iPhone XR ला रिप्लेस करणारा iPhone 11 बाजारात आणला आहे. iPhone XS चं रिप्लेसमेंट iPhone 11 Pro तर iPhone XS Max च्या जागी iPhone Pro Max लॉंच केला जाणार आहे. ही नवीन जनरेशन iPhone XR, iPhone XS आणि iPhone XS Max ह्या फोन्सची पुढील अपडेटेड व्हर्जन्स असतील.

कसा असेल iPhone 11?

iPhone 11 च्या डिजाईनमध्ये मोठा बदल केला जाणार असल्याचं बोललं जात आहे. या फोनच्या मागच्या बाजूला तीन कॅमेरा देण्यात येणार असल्याची सध्या चर्चा आहे. फोनच्या मॉडेलची काही छायाचित्रे देखील इंटरनेटवर लीक झाली आहेत. त्यावरुन या फोनच्या मागच्या बाजूला स्क्वेअर सेटअपमध्ये तीन कॅमेरे देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. अॅपलच्या पारंपारिक डिजाईनपेक्षा हे डिजाईन अतिशय वेगळं आहे मात्र कंपनीकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

iPhone 11 Pro मध्ये 5.8 इंचाचा स्क्रीन असू शकतो. तसेच यामध्ये ए13 चिपसेटसह 6 जीबी रॅम असेल असा अंदाज आहे. हा फोन 128 जीबी, 256 जीबी आणि 512 जीबी क्षमतेमध्ये मिळू शकतो. यामध्ये 12 मेगापिक्सल क्षमतेचा फ्रंट कॅमेरा आणि 12 मेगापिक्सल क्षमतेचा ट्रिपल रिअर कॅमेरा असणार आहे. या फोनमध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात येण्याचीही शक्यता आहे. या फोनची किंमत 72 हजार रुपयांपासून पुढे असू शकते.

iPhone 11 Max मध्ये 6.5 इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात येऊ शकतो. या फोनमध्येदेखील ए13 चिपसेट आणि 6 जीबी रॅम असेल. तसेच आयफोन 11 प्रो प्रमाणे हे मॉडेल देखील 128 जीबी, 256 जीबी, 512 जीबी क्षमतेमध्ये उपलब्ध होऊ शकते. या फोनमध्ये 12 मेगापिक्सल क्षमतेचा फ्रंट कॅमेरा आणि 12 मेगापिक्सल क्षमतेचा ट्रिपल रिअर कॅमेरा मिळेल. या फोनची किंमत 80 हजार रुपयांपासून पुढे असू शकते.

आयफोन ऑपरेटिंग सिस्टीम : iOS 13

आतापर्यंतची सुपरफास्ट ऑपरेटिंग सिस्टीम iOS 13

मुख्य म्हणजे आयओएस 13 ही आतापर्यंतचे सर्वात वेगवान ऑपरेटिंग सिस्टीम असेल. मोबाईल अॅपलिकेशन्स, त्यांचे अपडेट्स, डाऊनलोड्स हे मेमरी वाढण्यास कारणीभूत ठरतात, मात्र आता सुपरफास्ट iOS 13 च्या मदतीने याची साईज 50% मी होणार आहे, जेणेकरुन स्टोरेज कमी वापरलं जाईल. सोबतच फेस डिटेक्टिंग आयडीसुद्धा पूर्वीपेक्षा 30 टक्के फास्ट होणार आहे.

iOS 13 नवीन कॅमेरा मोड्स

आयफोनचा मोस्ट फेव्हरेट 'पोर्ट्रेट मोड' वापरताना तुम्ही मॅन्युअली स्टुडिओ लाईटिंग (प्रकाशयोजना) अॅडजस्ट करु शकता, iOS 13 मुळे आता पोर्ट्रेट लाईटिंग इफेक्ट्सची तीव्रतासुद्धा कमी-जास्त करता येणार आहे.

मोनोक्रोम मोडमध्ये आता हाय-की मोनोक्रोम नावाचं नवीन फिचर असेल, या फिल्टरचा फॅशन फोटोग्राफीमध्ये केला जातो. फोटोग्राफीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रोफेशनल कॅमेरामधील फिल्टर iOS 13 मुळे आता सहज मोबाईलमध्येही हाताळता येणार आहे.

iPhone 11 Pro Max मध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा लेन्स असणार आहे, सोबतच पॉवरफुल प्रोसेसर आणि वायरलेस रिव्हर्स चार्जिंगसारखे फिचर्स असतील.

फोनची साईझ मोठी असली तर प्रत्येकाला ऑपरेटिंग सोयीस्कर असतंच असं नाही, फोन ऑपरेटिंग कम्फरटेबल होण्यासाठी iPhone 11 मध्ये स्क्रीनची साईझ कमी करण्याचा पर्याय असणार आहे, तसंच ड्युअल रेअर कॅमेरासुद्धा असेल

iOS 13 डार्क मोड

गेल्या वर्षी मॅक्रोसवर डार्क मोड आणल्यानंतर Appleपल आता आयओएस 13 सह यावर्षी आयफोनवर मोड आणत आहे. स्टोअर Appleपल वॉलपेपरमध्ये आता डार्क मोड पर्याय, फोटो, स्मरणपत्रे आणि यासारखे अंधकारमय थीम आणि सर्व यूआय घटक असतील आणखी गडद होईल.

मागील वर्षी मॅकमध्ये डार्क मोड हे फिचर वापरण्यात आले, आता iOS 13 च्या मदतीने आयफोन युजर्सनादेखील डार्क मोड वापरता येणार आहे. स्टोअर्ड वॉलपेपर्समध्ये हा डार्क मोडचा पर्याय उपलब्ध असणार आहे. फोटोस, रिमाइंडर्ससोबत अनेक अॅपलिकेशन्स डार्क मोडमध्ये कनव्हर्ट करता येतील.

iOS 13 Memoji : पर्सनलाइज्ड मेमोजी

आयफोन X मध्ये स्वत:चं इमोजी तयार करणारं पर्सनलाइज्ड मेमोजी फिचर वापरण्यात आलं, आता iOS 13 मध्ये या फिचरमध्ये आपल्या चेहऱ्यानुसार स्टिकर्स बनवले जाणार आहेत जे तुमच्या किबोर्डवर उपलब्ध असतील, यात हेडगिअर, चष्मा, गॉगल्स, तुटलेले दात या गोष्टींचा वापर करुन तुम्ही स्वत:देखील त्याला कस्टमाइज करु शकणार आहात.

आयफोन 11, आयफोन 11 प्रो, आयफोन 11 प्रो मॅक्सची अंदाजे किंमत

आयफोन 11 ची किंमत 749 डॉलर्स म्हणजेच 53,700 असू शकते. आयफोन 11 प्रो ची किंमत जवळपास 72,000 असू शकते.  तर आयफोन प्रो मॅक्सची किंमत 79,000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. ओलेड डिस्प्लेची किंमत यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे. आयफोन 11 सिरीज प्रि-ऑर्डर करण्यासाठी 13 सप्टेंबरपर्यंत थांबावं लागणार आहे, तर 20 सप्टेंबरला अमेरिकेत हॅंडसेट्स उपलब्ध होतील तर पुढे दोन ते तीन आठवड्यापर्यंत दुकानांमध्ये भारतीयांना हा फोन खरेदी करण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

16 इंचाचा नवा मॅकबुक प्रो

अॅपलचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा लॅपटॉप असेल, वर्षभर मॅकबुक फार चर्चेत आहे, त्यामुळे आज अॅपल मॅकबुकचीही घोषणा करेल ही अपेक्षा आहे.

अॅपल वॉच सिरीज 5 नव्या केसमध्ये

आज होणाऱ्या इव्हेंटमध्ये अॅपल वॉचची नवीन सिरीज अॅपल वॉच 5 लॉंच करण्याची शक्यता आहे. हे सिरीज 4 चं अपग्रेड असणार आहे, यासाठी कंपनी टायटेनियम आणि सिरॅमिक केसचा वापर करणार आहे.

 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 20 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत करावे लागणार?
2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार?
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Uday Samant: उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
Embed widget