Apple Event 2022 Date, Time and LIVE Streaming : प्रतीक्षा संपली! iPhone 14 आज होणार लाँच; कुठे आणि किती वाजता पाहता येणार अॅपलचा ग्रँड इव्हेंट, जाणून घ्या...
अॅपल कंपनी त्यांची आयफोन 14 ही सीरिज लाँच करणार आहेत. हा कार्यक्रम कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथे पार पडणार आहे.
![Apple Event 2022 Date, Time and LIVE Streaming : प्रतीक्षा संपली! iPhone 14 आज होणार लाँच; कुठे आणि किती वाजता पाहता येणार अॅपलचा ग्रँड इव्हेंट, जाणून घ्या... apple far out event 2022 iPhone 14 launch date time and live streaming in india know about this Apple Event 2022 Date, Time and LIVE Streaming : प्रतीक्षा संपली! iPhone 14 आज होणार लाँच; कुठे आणि किती वाजता पाहता येणार अॅपलचा ग्रँड इव्हेंट, जाणून घ्या...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/07/82f1cc4090f4a9185474962df72f23a11662512312963259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Apple Event 2022 Date, Time and LIVE Streaming : अॅपल कंपनीचा 'फार आउट' हा ग्रँड इव्हेंट आज (7 सप्टेंबर) पार पडणार आहे. या इव्हेंटमध्ये अॅपल कंपनी त्यांची आयफोन 14 (iPhone 14 Launch) ही सीरिज लाँच करणार आहेत. हा कार्यक्रम कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथे पार पडणार आहे. अॅपलचा हा इव्हेंट तुम्ही देखील पाहू शकता. कुठे? आणि किती वाजता? ते जाणून घ्या...
अॅपल कंपनी iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro, iPhone 14 Pro Max यांच्यासोबतच Apple Watch Series 8, AirPods Pro 2 हे प्रोडक्ट्स देखील लाँच करु शकते, असं म्हटलं जात आहे. जगभरातील अॅपलचे चाहते या इव्हेंटची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते.अॅपलचे चाहते हा लाँच इव्हेंट पाहू शकणार आहेत. काही निवडक प्लॅटफॉर्मवर हा इव्हेंट लाईव्ह दाखवला जाणार आहे.
Apple ची अधिकृत वेबसाइट, Apple TV+ आणि अॅपल कंपनीचे अधिकृत YouTube चॅनेल या प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही हा इव्हेंट पाहू शकणार आहात. भारतीय वेळेनुसार Apple iPhone 14 सीरिजचा लॉन्च इव्हेंट रात्री 10:30 वाजता सुरू होईल. भारतातील लोक हा इव्हेंट 10: 30 वाजता पाहू शकणार आहेत तर क्युपर्टिनोमध्ये हा इव्हेंट 10 वाजता सुरु होणार आहे.
Go for launch. Tune in for a special #AppleEvent on 7 September at 10:30 PM IST.
— Apple (@Apple) August 26, 2022
Tap the ❤️ and we’ll send you a reminder on event day. pic.twitter.com/hBmTLLB3zb
आयफोन 14 सीरिजच्या किमती काही मीडिया रिपोर्ट्सद्वारे लीक झाल्या आहेत. या मीडिया रिपोर्टनुसार, iPhone 14 ची किंमत 749 डॉलर्स (भारतीय चलनात 59,440 रुपये), iPhone 14 Max ची किंमत 849 डॉलर्स (भारतीय चलनात 67376 रुपये), iPhone 14 Pro ची किंमत 1,049 डॉलर्स (भारतीय चलनात 83248 रुपये) आणि iPhone 14 Pro Max ची किंमत 1,149 डॉलर्स (भारतीय चलनात 91184 रुपये) आहे. रिपेर्टनुसार, आयफोन 14 प्रो जांभळ्या रंगात असेल. तसेच या आयफोनमध्ये गोल्ड आणि ग्रे रंगाचा पर्यात उपलब्ध असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. नव्या आयफोन 14 प्रोमध्ये डिस्प्लेवर नॉनऐवजी पंच-होल आणि गोल कटआऊट डिझाइन असेल. शिवाय डिस्प्लेमध्ये अरुंद बेझल्स असतील, यामुळे या आयफोनला अधिक पॉलिश लूक मिळेल, असा अंदाज लीक रिपोर्ट्समध्ये वर्तवण्यात आला आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Amazon Deal : 'या' खास फिचरमुळे अॅपल वॉच आहे अतिशय खास; जाणून घ्या वैशिष्ट्य
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)