(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Twitter New Features : आता Twitter Spaces ची करू शकता 'रेकॉर्डिंग', कंपनीने लॉन्च केले नवीन फीचर
Twitter Spaces : ट्विटरने आपल्या स्पेस (Spaces) प्लॅटफॉर्मसाठी रेकॉर्डिंगचे नवीन फीचर लॉन्च केले आहे. या नवीन फीचरचा वापर अॅन्ड्रॉईड (Android) आणि iOS दोन्ही यूजर्स करू शकतात.
Twitter New Update : तुम्ही जगात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरच्या (Twitter)स्पेसचा (Spaces) वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ट्विटरने नुकतंच रेकॉर्ड स्पेस ( Record spaces) नावाचं एक नवीन फीचर लॉन्च केलं आहे. या नवीन फीचरच्या माध्यमातून आता तुम्ही स्पेसला रेकॉर्डसुद्धा करू शकता. तुम्ही जर अॅन्ड्रॉईड (Android) आणि iOS वापरकर्ते असाल तर तुम्ही या नव्या फीचरचा लाभ घेऊ शकता. या नवीन फीचरबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.
कशाप्रकारे हे फीचर काम करेल :
जर तुम्ही स्पेसचा वापर करत असाल आणि या दरम्यान होणाऱ्या चर्चेला रेकॉर्ड करण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्हाला स्क्रिनवर "रेकॉर्ड स्पेस" असे बटण दिसेल. या बटणावर क्लिक करून तुम्ही तुमची चर्चा रेकॉर्ड करू शकता.
30 दिवसांसाठी राहील रेकॉर्ड मेंटेन :
या फीचरचा तुम्ही वापर केल्यानंतर तुमच्या चर्चेची फाईल 30 दिवसांसाठी तुमच्याकडे सेव्ह असेल. तसेच, ट्विटर रेकॉर्डिंगची एक फाईल 120 दिवसांकरिता ट्विटरकडे ती सेव्ह राहिल.
स्पेस म्हणजे नेमकं काय ?
ट्विटर स्पेस हा ऑडिओमध्ये संभाषण करण्याचा एक प्लॅटफॉर्म आहे. या फीचरद्वारे अनेकजण एकाच वेळी संभाषण करू शकतात. इतर फीचर्सप्रमाणेच सर्वसामान्यांसाठी वापरला जाणारा हा प्लॅटफॉर्म आहे. विशेष म्हणजे स्पेसला ऐकण्यासाठी तुम्हाला ट्विटर अकाऊंटची गरज असलीच पाहिजे याचं बंधन नाही. तुम्ही सरळ त्या स्पेसला जॉईन होऊ शकता. यामध्ये तुम्हाला जे फॉलो करत नाहीत असे लोकसुद्धा सहभाग घेऊ शकतात. एकाच वेळी या फीचरचा लाभ जास्तीत जास्त 13 लोक घेऊ शकतात. त्यामुळे ट्विटर यूजर्स लवकरच या नवीन फीचरचा लाभ घेऊ शकतात.
हे ही वाचा :
- Apple iPhone SE 3: बाजारात येतोय ॲपलचा सर्वात स्वस्त आयफोन; मार्चमध्ये लॉन्च होण्याची शक्यता
- Amazon Deal : भन्नाट ऑफर! 75 हजारांचा Samsung स्मार्टफोन खरेदी करा फक्त 35 हजारांत
- इंटरनेट कनेक्शन शिवाय 'टॅप टू पे' द्वारे करा सुरक्षित पेमेंट, PayTm ची ग्राहकांसाठी नवी सुविधा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha