iPhone 14 लाँच होताच iPhone 13 ची किंमत घसरली! 'इतक्या' स्वस्तात होतेय विक्री, जाणून घ्या
iPhone 13 Price In India : जागतिक आर्थिक मंदी लक्षात घेता नवीन आयफोन मॉडेल त्यांच्या मागील सीरीजपेक्षा जास्त महाग नाहीत, ही बाब ग्राहकांसाठी दिलासादायक आहे.
iPhone 13 Price In India : Apple ने बुधवारी त्यांच्या फार आउट इव्हेंटमध्ये नवा iPhone 14 सीरीजची घोषणा केली. जागतिक आर्थिक मंदी लक्षात घेता नवीन आयफोन मॉडेल त्यांच्या मागील सीरीजपेक्षा जास्त महाग नाहीत, ही बाब ग्राहकांसाठी दिलासादायक आहे. मात्र याबाबत आणखी एक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे जे लोक iPhone 13 खरेदी करण्याची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांच्यासाठी Apple ने किमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ग्राहक आता या फोनच्या किंमतीबाबत जाणून घेण्यात व्यस्त दिसत आहेत. भारतातील एक वर्षापूर्वी iPhone 13 ची किंमत पाहिली तर याच्या लॉन्चिंगच्या किंमतीपेक्षा 10,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. जाणून घ्या सविस्तर.
iPhone 13 10 हजार रुपयांनी स्वस्त
Apple भारतातील त्यांच्या ऑनलाइन स्टोअरवर यापूर्वी 79,900 रुपयांच्या लॉन्च किमतीवर iPhone 13 विकत होते. iPhone 13 ची किंमत 69,900 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. सणासुदीच्या विक्रीदरम्यान Amazon आणि Flipkart वर iPhone 13 वरील सूट देण्यात आली आहे, ज्यामुळे ग्राहकांना लाँचच्या किंमतीपेक्षा 15,000 रुपयांनी कमी किंमतीत डिव्हाइस मिळू शकतो. Apple Store ला प्राधान्य दिल्यास आता तुम्हाला iPhone 13 साठी 10,000 रुपये कमी द्यावे लागतील. Phone 13 चांगल्या डील्स बाजारात उपलब्ध आहेत, जे तुम्ही लगेच मिळवू शकता.
iPhone 13, iPhone 13 mini भारतातील किंमत
iPhone 13 फोनची किंमत आता 69,900 रुपयांपासून सुरू होते, तर iPhone 13 Mini आता 64,900 रुपयांपासून सुरू होते. पाहा किंमतींची संपूर्ण यादी
iPhone 13 मिनी 128GB – रु. 64,900
iPhone 13 मिनी 256GB – रु 74,900
iPhone 13 mini 512GB – रु 94,900
iPhone 13 128GB – रु. 69,900
iPhone 13 256GB – रु 79,900
iPhone 13 512GB – रु 99,900
iPhone 12 च्या किंमतीतही कपात
Apple ने भारतात iPhone 12 च्या किमतीतही कपात केली आहे. आयफोन 12 आता 59,900 रुपयांपासून सुरू होतो, तर आयफोन 12 मिनी बंद करण्यात आला आहे. iPhone 12 Mini ची पूर्वीची किंमत 64,900 रुपये होती तर iPhone 12 ची किंमत 69,900 रुपये होती. आयफोन 12 दोन वर्षांपूर्वी आयफोन 14 सारख्याच किमतीत लॉन्च करण्यात आला होता.
संबंधित बातम्या