एक्स्प्लोर
Advertisement
75 टक्के वाहन चालकांना जीपीएस माहितच नाही : सर्व्हे
मुंबई : देशातील 75 टक्के ड्रायव्हरना जीपीएस कसं वापरावं याची माहिती नसल्याची बाब एका सर्व्हेमधून समोर आली आहे. तसंच 40 टक्के ड्रायव्हरना चुकीच्या पद्धतीनं गाडी एक्सलरेट केल्यास आणि अनावश्यक ब्रेकचा वापर केल्यास त्याचा गाडीच्या इंधन विपरीत वापरावर परिणाम होतो याची माहिती नसल्याचंही उघड झालं आहे.
नुकताच वाहनचालकांचा एक सर्व्हे फोर्ड मोटर कंपनीकडून करण्यात आला. या सर्व्हेतून अशा अनेक बाबी समोर आल्या आहेत. जवळपास एक चतुर्थांश वाहनचालकांना गाडी थांबलेली असताना सुरु ठेवल्यानं इंधनात बचत होते असं वाटतं. फोर्डच्या या सर्व्हेत 95 टक्के चालकांनी वाहनाची इंधनक्षमता वाढवण्याची ते प्रयत्न करतात असं सांगितलं.
फोर्डने आशिया आणि युरोपमध्ये हा सर्व्हे घेतला आहे. या सर्व्हेसाठी 9,500 वाहनचालकांना विचारात घेतलं आहे. भारतातील 1,020 वाहनचालकांनी या सर्व्हेत सहभाग घेतला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement