एक्स्प्लोर
'भीम' अॅपचं नवं व्हर्जन, 7 नव्या भाषांचा समावेश
मुंबई : यूनिफाईड पेमेंट्स इंटरफेसवर (UPI) आधारित मोबाईल अॅप भारत इंटरफेस फॉर मनी (BHIM) अॅपचं अपडेटेड व्हर्जन लॉन्च करण्यात आले आहे. गूगल प्ले स्टोअरवर नवं व्हर्जन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. एनपीसीआयने 'भीम' अॅप 30 डिसेंबरला पहिल्यांदा लॉन्च केलं होतं आणि त्यानंतर पहिल्यांदाच अपडेटेड व्हर्जन लॉन्च करण्यात आलं आहे.
'भीम' अॅपच्या नव्या व्हर्जनमध्ये म्हणजेच 'भीम 1.2'मध्ये 7 नव्या भाषांचा समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत हिंदी आणि इंग्रजी अशा दोनच भाषांमध्ये अॅप उपलब्ध होतं.
या 7 नव्या भाषांमध्ये आता भीम 'अॅप' :
1. उडिया
2. बंगाली
3. तमिळ
4. तेलुगू
5. मल्याळम
6. कन्नड
7. गुजराती
विशेष म्हणजे 'आधार नंबरला पैसे पाठवा' असं नवं फीचरही समाविष्ट करण्यात आले आहे. ज्या बँक खात्याला आधार कार्ड जोडलेला आहे, त्यामध्ये पैसे पाठवणं शक्य होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement