एक्स्प्लोर
5 स्टार एसीमुळे वीज बचत नाही, तर 28% जास्त खर्च: CSE
मुंबई: एसी खरेदी करताना आपण सगळ्यात जास्त लक्ष त्या एसीला किती स्टार आहेत याकडेच असतं. 5 स्टार एसी हा सगळ्यात चांगला आणि वीज बचत करणारा समजला जातो. पण सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एनव्हायरमेंट म्हणजेच सीएसईने दावा केला आहे की, 5 स्टार एसीच्या नावाखाली तुम्हाला धोका देण्यात येत आहे.
5 स्टार एसी हा उन्हाळ्यात वन स्टार एसीसारखं काम करतो. वीज बचत नाही तर तब्बल 28 टक्के जास्त वीज खर्च करतो.
एसी खरेदी करताना आपण त्याच्या स्टिकरवर किती स्टार आहेत हे आवर्जून पाहतो. स्टार किती रंगीत आहे तेवढं त्याचं रेटिंग असतं. म्हणजेच जेवढे स्टार जास्त असतील तेवढी विजेची बचत होईल. पण हे स्टिकर तुम्हाला भुलवण्याचा आणि एसी जास्त किंमतीत विकण्यासाठी केलेला खटाटोप आहे?
सीएसईच्या रिपोर्टनुसार, 5 स्टार एसीमुळे वीज बचतीचा दावा हा एक धोका आहे. वीज बचत होत नाही तर वीज जास्त खर्च होते. त्यामुळे पैसे जादा जातात. उन्हाळ्यात पारा जवळजवळ 40 डिग्रीपर्यंत पोहचतो तेव्हा तुमचा 5 स्टार हा एखाद्या 2 स्टार एसीप्रमाणे काम करतो. जेव्हा पार 45 डिग्रीपर्यंत पोहचतो तेव्हा 5 स्टार एसी हा 1 स्टार एसीचं काम करतो. त्यामुळेच तुमच्या वीजबिलात बरीच वाढ होते.
5 स्टार एसी खरेदी करण्यासाठी जास्त पैसा खर्च करावा लागतो. पण हाच एसी उन्हाळ्यात कमी थंडावा देतो. स्टार रेटिंग देण्याचं काम ब्युरो ऑफ एनर्जी एफ्फीसिएंसी करतं. 5 स्टार एसी 20 ते 22 टक्के वीज बचतीचा दावा करतं. पण दीड टन असणारा हा एसी तेव्हा एक टन एसीप्रमाणे चालतो.
सीएसईने व्होल्टास, एलजी आणि गोदरेजच्या तीन मॉडेल्सच्या 5 स्टार एसीचं रिपोर्ट तयार केलं आहे. बाजारात जवळजवळ 50 टक्के याच कंपनीच्या एसीची विक्री होते. सीएसईच्या दाव्यानंतर आता कंपन्यांची जबाबदारी आहे की, त्यांनी ग्राहकांना 5 स्टार एसी द्यावा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement