एक्स्प्लोर
Advertisement
भारतात एका सेकंदाला 30 हॅकिंग, हॅकिंगमध्ये अमेरिकेनंतर भारत दुसऱ्या स्थानी
या रिपोर्टनुसार जगभरात सायबर हल्ल्यांमध्ये विभिन्न सेक्टर्सला निशाणा बनविले आहे. यामध्ये मीडिया, मनोरंजन, रिटेल आणि गेमिंग ही क्षेत्रं आघाडीवर आहेत.
नवी दिल्ली : जगभरात हॅकिंगचे प्रमाण वाढत आहे. यामुळे नेटीजन्स चिंतेत आहेत. भारतीयांसाठी या चिंतेत अजून वाढ झाली आहे. कारण भारतात एका सेकंदाला 30 हॅकिंगचे प्रकार समोर येत असून 120 कोटींपेक्षा अधिक अकाउंट धोक्यात असल्याचे एका अहवालात समोर आले आहे. अमेरिकेनंतर हॅकिंग करु सायबर हल्ले होण्यामध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे.
भारतात 2018 मध्ये 120 कोटींपेक्षा अधिक अकाउंटवर हॅकर्सनी हल्ले केले असून ही सर्व अकाउंट धोक्यात आहेत. अमेरिकेत 125 कोटींपेक्षा जास्त अकाउंटवर हॅकर्सकडून सायबर हल्ला करण्यात आला आहे.
क्लाउड डिलिव्हरी नेटवर्क अकमाई टेक्नॉलॉजीच्या 'स्टेट ऑफ इंटरनेट/सिक्युरिटी' या रिपोर्टनुसार प्रत्येक हॅकिंगमध्ये कुणीतरी व्यक्ती अथवा संगणकाद्वारे अन्य अकाउंटची माहिती चोरून युझरनेम अथवा पासवर्ड जनरेट करण्यासाठी लॉग इन केले आहे.
सायबर हल्ल्यात अमेरिका आणि भारतानंतर कॅनडा तिसऱ्या नंबरवर आहे. अमेरिकेत 2018 मध्ये 125 कोटी हॅकिंगचे प्रयत्न झाले तर भारतात 120 कोटी तर कॅनडात 102 कोटी गुन्हे या प्रकरणांमध्ये दाखल झाले आहेत.
या रिपोर्टनुसार जगभरात सायबर हल्ल्यांमध्ये विभिन्न सेक्टर्सला निशाणा बनविले आहे. यामध्ये मीडिया, मनोरंजन, रिटेल आणि गेमिंग ही क्षेत्रं आघाडीवर आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement