Majhi Tujhi Reshimgath : ‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये नवी एण्ट्री होणार, समीर आणि शेफालीचं नातं आता तरी जुळणार?
Majhi Tujhi Reshimgath : या मालिकेत यश नेहा प्रमाणेच अजून एक जोडी प्रेक्षकांना बघायला आवडते, ती म्हणजे समीर आणि शेफालीची. दोघांमधील नोकझोक प्रेमात कधी बदलणार, याची वाट प्रेक्षक पाहत आहेत.

Majhi Tujhi Reshimgath : झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेतील यश-नेहाची जोडी आणि परीचा निरागस अभिनय प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडला. इतकंच नव्हे, तर या मालिकेतील आजोबा, बंडू काका काकी, समीर, शेफाली, सिम्मी या आणि अशा इतर व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. यश नेहा प्रमाणेच अजून एक जोडी प्रेक्षकांना बघायला आवडते, ती म्हणजे समीर आणि शेफालीची.
समीर आणि शेफाली, दोघांमधील नोकझोक प्रेमात कधी बदलणार, याची वाट प्रेक्षक पाहत आहेत. समीर आणि शेफालीचं जुळवून देण्यासाठी आता या मालिकेत एका अभिनेत्रीची एण्ट्री होणार आहे. शेफालीची आई ‘मोहिनी’ ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना लवकरच मालिकेत पाहायला मिळणार आहे. ‘मोहिनी’ ही व्यक्तिरेखा अभिनेत्री गौरी केंद्रे साकारणार आहेत. ही एक मजेदार भूमिका असणार आहे, जी प्रेक्षकांना पाहायला आवडेल. या व्यक्तिरेखेच्या एण्ट्रीमुळे समीर आणि शेफाली यांची मैत्री प्रेमात बदलेल का हे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल.
मोहिनी पाहताना धमाल येईल!
या भूमिकेबद्दल बोलताना अभिनेत्री गौरी केंद्रे म्हणाल्या की, ‘माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं आहे. या लोकप्रिय मालिकेत एका रंजक वळणावर मोहिनी या व्यक्तिरेखेची एण्ट्री होतेय. मी, मोहिनी म्हणजेच शेफालीच्या आईची भूमिका साकारतेय, जे एक हसमुख व्यक्तिमत्व आहे. मोहिनीमुळे प्रेक्षकांना मालिका पाहताना मजा येईल. मोहिनी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल.’
सध्या मालिकेत परी पॅलेसवर आलेली असल्याने आजोबांनी तिला पॅलेसवरच राहण्याचा सल्ला दिला आहे. परी नेहाच्या बाजूला राहणारी गोड, हुशार मुलगी आहे, असे आजोबांना वाटते. पण, परी नेहाची मुलगी असल्याचे सत्य आजोबांना समजल्यानंतर आजोबा काय प्रतिक्रिया देणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
- Will Smith : ‘थप्पड’ प्रकरणाचा विल स्मिथच्या वैवाहिक जीवनावर परिणाम! पत्नीसोबत घटस्फोट घेणार?
- Irsal : बहुचर्चित 'इर्सल' चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ दिवशी होणार चित्रपट रिलीज!
- Alia-Ranbir Wedding : आलिया-रणबीरच्या लग्नाच्या फोटोत दिसले ऋषी कपूर, चाहत्याचे प्रेम पाहून नीतू कपूरही झाल्या भावूक!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
