एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एसटीच्या चालक, वाहकांना ऑन ड्युटी मोबाईल वापरास बंदीचं फर्मान
या मोबाईल बंदीमध्ये एसटी चालकांना बंदी आणण्याचा निर्णय जरी योग्य असला तरी या निर्णयामुळे एसटी वाहक मात्र भरडले जात आहेत. संकटकाळात या कर्मचाऱ्यांनी आपल्या विभागाशी संपर्क कसा करायचा? असा सूर देखील एसटी कर्मचाऱ्यांमधून निघत आहेत.
मुंबई : एसटीच्या चालक, वाहकांना ऑन ड्युटी मोबाईल वापरास बंदीचे फर्मान एसटी प्रशासनाने जारी केलं आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी एक जानेवारी ते सहा जानेवारी 2020 या कालावधीत विशेष मार्ग तपासणी कार्यक्रम राबवून ऑन ड्युटी मोबाईल वापरणाऱ्या चालक, वाहकांची तपासणी करण्यात यावी तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवावा असं देखील एसटी प्रशासनाने 26 डिसेंबर 2019 च्या परिपत्रकात नमूद केलं आहे.
मात्र मार्गात एसटी बस ब्रेक डाऊन झाल्यास, काही तांत्रिक समस्या उद्भवल्यास अशा वेळी चालक, वाहकांनी काय करावे?, चालक, वाहकांना आपल्या नातेवाईकाला अथवा नातेवाईकाने ऑन ड्युटी असलेल्या चालक अथवा वाहकाला तातडीचा निरोप देण्यासाठी काय करावे? याविषयीचा उल्लेख या परिपत्रकातून टाळण्यात आला आहे.
मोबाईलवर बोलत असतांना एसटी चालक वाहन चालवतांनाचे व्हिडीओ सोशल मीडियातून व्हायरल झाले आहेत. त्यामुळे चालकांना मोबाईल वापरास बंदी समजू शकतो, मात्र वाहकाला देखील मोबाईल बंदी कश्यासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सोबतच मार्गात एसटीत तांत्रिक बिघाड झाला तर अशावेळी चालक, वाहकाने काय करावे? प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे का? असा प्रश्न देखील एसटी कर्मचाऱ्यांनी समाजमाध्यमातून उपस्थित केला आहे.
एसटी प्रशासनाने यापूर्वी काढलेल्या किती परिपत्रकांची प्रभावी अंमलबजावणी झाली याचा देखील आढावा घ्यावा, असे देखील काही कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. एक तासापेक्षा अधिक उशिरा गाड्या सोडू नयेत, प्रत्येक बसचा हॉर्न, इंडिकेटर, हेड लाईट, ब्रेक लाईट, सीट बेल्ट, तसेच प्रवाशी सीट, बसच्या खिडक्या योग्य आहेत का? बसच्या टायरची अवस्था? लॉग शीटवर चालकांनी बसच्या स्थिती बाबत शेरा मारून देखील त्यावर कार्यवाही न करणाऱ्यांवर काय कारवाई झाली का?, बस स्वच्छ करण्यात कसूर करणाऱ्यांवर काय कारवाई झाली? या सर्वच गोष्टींचा देखील एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कधी आढावा घेतलाय का? असा सवाल देखील काही कर्मचाऱ्यांनी केला आहे.
प्रवासादरम्यान तिकीट मशीन वारंवार बंद पडणे, तिकीटाची प्रिंट अस्पष्ट निघणे, अथवा प्रिंट न निघणे, तिकीट मशीनची बॅटरी सतत उतरणे, खराब तिकीट मशीन देणे अशा तक्रारी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जाऊन देखील त्यावर कार्यवाही न करणाऱ्यांवर काय कारवाई झाली? याचा देखील आढावा घ्यावा अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी समाज माध्यमातून केली आहे.
आता एसटी प्रशासनाच्या या नव्या निर्णयाने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये रोषाचे वातावरण आहे.
Explainer Video | एसटी महामंडळ कसे अडचणीत आले? | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
निवडणूक
क्रीडा
निवडणूक
Advertisement