(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Jarange : जातीशी गद्दारी करणं माझ्या रक्तात नाही, शेवटपर्यंत राजकारणात जाणार नाही, मनोज जरांगेंकडून भूमिका स्पष्ट
Manoj Jarange : जोपर्यत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राजकारण्यांना सुट्टी नाही, अशी स्पष्ट भूमिका मनोज जरांगे यांनी व्यक्त केली आहे.
पंढरपूर : मराठ्यांना आरक्षण (Maratha Aarkashan) देणे हेच मुख्य उद्दिष्ट आहे. आरक्षणासाठी सगळे नेते एकत्र या. सत्ताधारी-विरोधक एकत्र या आणि मराठ्यांना आरक्षण द्या. त्याशिवाय सुट्टी नाही असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं. माझ्या समाजाशी मी प्रामाणिक असून कुणाशीही गद्दारी करू शकत नाही. आपल्याकडे कोणी त्याबाबत बोटही दाखवू शकत नाही, कारण मी माझ्या जातीला मायबाप म्हणलं असून माय बापाशी गद्दारी करणे, माझ्याकडून शक्य नसल्याचे सांगत मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी राजकारणात जाणार का या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचा महाराष्ट्र दौरा (Maharashtra) असून आवाज सकाळी ते पंढरपूरमध्ये होते. यावेळी त्यांनी एबीपी माझाशी बोलतांना राजकारणात जाणार यासह इतर प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी ते म्हणाले की, गेल्या काही महिन्यापासून मराठा आंदोलनासाठी (Maratha Aandolan) झटतो आहे, हा मराठा समाज मला लेकराप्रमाणे प्रेम करत आहे. समाजाला माहित आहे की, आपला मुलगा आपल्याशी कधीही दगाफटका करणार नाही. समाजाच लेकरू असल्याने अनेक माय माउल्यांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे राजकारण आपली वाटच नाही, तो माझा मार्गच नाही. त्यामुळे जोपर्यत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राजकारण्यांना सुट्टी नाही, अशी स्पष्ट भूमिका मनोज जरांगे यांनी व्यक्त केली आहे.
त्यानंतर सद्यस्थिती ओबीसी समाज बांधव (OBC Reservation) देखील मराठा आरक्षणाला विरोध करत असल्याची चर्चा आहे. यात अनेक नेते आडकाठी घालत असल्याचे बोलले जात आहे. यावर जरांगे म्हणाले की, आम्ही ओबीसीबद्दल कधीही वाईट विचार केलेला नाही. ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी अनेकांनी आयुष्य झिजवले, त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवा. आज मराठ्यांची पोरं अडचणी आहेत, मात्र तुम्ही मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध करत आहेत, हे योग्य नाही. ज्या मराठ्यांनी यांची मान उंचावण्यासाठी त्यांनी कधीच हा ओबीसीचा नेता आहे, असं बघितल नाही. आज मराठा समाज बांधवांच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आला तर तुम्ही म्हणताय आरक्षण देऊ नका, हे त्यांचे हे वागणं योग्य वाटत नाही. नेत्यांचे ऐकण्यापेक्षा सामान्य ओबीसी बांधवानी समजून घेतले पाहिजे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.
सगळा मराठा ऑलरेडीच ओबीसीमध्ये....
एक लक्षात घ्या सगळा मराठा ऑलरेडीच ओबीसीमध्ये गेलेला आहे. विदर्भापासून खानदेश, पश्चिम महाराष्ट्र मराठा बांधव ओबीसीमध्ये गेलेला आहे. आता उर्वरित मराठवाड्याचा काही भाग,उर्वरित महाराष्ट्राचा काही भाग आता राहिला आहे. सरसकट मराठा याचा अर्थ पाच कोटी मराठा असा धरला जातो. जवळपास सगळा मराठा आरक्षणामध्ये गेलेला आहे. फक्त मराठवाडा आणि काही पश्चिम महाराष्ट्रातला उर्वरित महाराष्ट्र राहिला आहे, हे त्यांनी समजून घेतले तर मराठा आरक्षणाला विरोधच करणार नाही. पण नेते उलटच सांगतात, ते त्यांनी सांगायला नको, पण आम्ही आमचं आरक्षण मिळवणारच, त्यांच्यासोबत असणारा मराठा बांधव त्यांच्यावर नाराज होऊ लागला आहे. किमान त्यांनी इथून पुढे तरी मराठा आरक्षणाला ओबीसी नेत्यांनी विरोध करू नये, त्यांच्या मतदारसंघातील मराठा समाज या ओबीसी नेत्यांवर खूप नाराज आहे, याची जाणीव ठेवावी, असे मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाची बातमी :
Manoj Jarange On OBC :ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या वाटेत येऊ नये,मराठा समाजाच्या पाठीशी राहावं